'भीक देता की मदत? ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार'

'भीक देता की मदत? ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार'

सरकारनं जाहीर केलेली ही मदत अगदी तुटपूंज असून महाविकास आघाडी सरकारवर संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांना सरकारनं मदत जाहीर केली. सरकारनं जाहीर केलेली ही मदत अगदी तुटपूंज असून महाविकास आघाडी सरकारवर संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी टीका केली आहे.

सरकारनं जाहीर केलेली मदत म्हणजे भीक असल्याचा उल्लेख केला आहे. तर आम्ही याचा जाहीर निषेध करतो असं म्हणत सरकारनं शेतकऱ्यांचा तोंडाला पानं पुसली आहेत. शेतकऱ्यांना हेक्टरी 10 हजार म्हणजे एकरी 4000 रूपये अर्थात प्रत्येकी 100 रुपये प्रती गुंठा मदत जाहीर केली. सरकार भीक देत आहे की मदत?

तुटपुंज्या 10,000 कोटी रूपयांत 5% रक्कम अधिकाऱ्यांच्या 'टोल' मध्ये वाटण्यात जाणार आहेत. हे 'रंगा-बिल्ला' शेतकऱ्यांच्या जखमेवर 'मीठ' चोळत आहेत अशी टीका संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. शेतकऱ्यांना केलेल्या तुटपुंज्या मदतीवरून भाजपनेही कडाकडून निषेध केला आहे.

हे वाचा-खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत दिली जाईल असं ते म्हणाले. केंद्र सरकारचे निकष आहे त्यापेक्षा जास्त मदत देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. हेक्टरला 10 हजार रुपयांची मदत करण्यात येईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या हक्काचे 38 हजार कोटी येणं बाकी आहे. ते पैसे मिळावे म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 24, 2020, 1:02 PM IST

ताज्या बातम्या