आता भाजपमध्ये आऊट गोईंग, हा मोठा नेता आहे शिवसेनेच्या रडावर

आता भाजपमध्ये आऊट गोईंग, हा मोठा नेता आहे शिवसेनेच्या रडावर

विधानसभा निवडणुकीच्या काळात मेगाभरतीने राजकारणात भाजपने वादळ निर्माण केलं होतं. निवडणुकीच्या निकालानंतर सगळीच समिकरणं बदलली. आता भाजपला धक्के देण्यासाठी शिवसेना प्रयत्न करतेय.

  • Share this:

मुंबई 05 डिसेंबर : विधानसभा निवडणुकीच्या काळात मेगाभरतीने राजकारणात भाजपने वादळ निर्माण केलं होतं. निवडणुकीच्या निकालानंतर सगळीच समिकरणं बदलली आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची गोची झालीय. तर भाजपमध्ये अस्वस्थ असलेल्या नेत्यांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध बंडाचं निशाण फडकवलं आहे. या सगळ्या असंतुष्टांचं नेतृत्व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे आलंय. खडसेंची ही अस्वस्थता गेली चार वर्षांपासून असून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न शिवसेनेने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. खडसे हे भाजपचे दिग्गज नेते असून गेली 40 वर्ष त्यांनी महाराष्ट्रात भाजप रुजविण्यासाठी मेहनत घेतली. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाने मुख्यमंत्रिपदाची माळ ही देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात घातली.

देवेंद्र फडणवीसांना दणका, निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या निर्णयांना स्थगिती

त्यामुळे खडसे अस्वस्थ होते. त्यानंतर त्यांनी फडणवीसांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केलेत. त्यामुळे खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप होताच त्यांना राजीनामा द्यायचा भाग पाडण्यात आलं होतं. त्यानंतर यावेळी विधानसभा निवडणुकीतही त्यांना तिकीटही नाकारण्यात आलं होतं. त्यांच्या ऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट देण्यात आलं आणि त्यात त्यांचा पराभव झाला. त्यामुळे खडसे प्रचंड अस्वस्थ आहेत. बदलती राजकीय समिकरणं लक्षात घेऊन शिवसेनेनं काही नेत्यांवर खडसेंशी बोलण्याची जबाबदारी सोपवली अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली. त्यामुळे पुढच्या काळात भाजपला धक्के बसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

दरम्यान प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आपण एकत्र यायला हवं अशी भूमिका मांडल्याचं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार, पण दिल्लीत नाही तर...

'भाजपमध्ये वर्षानुवर्ष ओबीसी नेत्यांवर अन्याय होत आहे. आता हे थांबवण्यासाठी आम्ही एकनाथ खडसे यांची भेट घेतली. तसचं याकरता इतर भाजपच्या नेत्यांची पण भेट घेणार आहे,' असं प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे आज जे नेते शेंडगे यांच्या सोबत खडसे यांच्या भेटीला गेले होते त्यापैकी एकही जण भाजपचा सदस्य नाही. स्वत: प्रकाश शेंडगे हे सध्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे इतर नाराज भाजप नेतेही शिवसेनेसोबत जाण्याचा विचार करत आहेत का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

दरम्यान, भाजप नेते विनोद तावडे पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची काल भेट घेतली आहे. एकनाथ खडसे यांच्या मुंबईतील निवासस्थानी या दोन नेत्यांमध्ये बैठक झाली. बंडखोरांचा दोन्ही नेत्यांवर वाढता दबाव आणि पक्षातील नाराजी नाट्यावर विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भेटीनंतर एकनाथ खडसे हे पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी गेले होते.

फडणवीसांचे 'संकटमोचक' अडचणीत, चार सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची शक्यता!

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद गमावल्यानंतर भाजपमधील नाराजांनी डोकं वर काढलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते थेट माध्यमांसमोर येत फडणवीसांवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे, भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपल्या समर्थकांना सूचक संदेश दिला आहे. त्यानंतर पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र फक्त पंकजा मुंडेच नाही तर राज्यातील भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते बंडाचा झेंडा हाती घेणार की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 5, 2019, 7:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading