Home /News /maharashtra /

Balasaheb Thackeray स्मारक भूमिपूजनावरून राजकारण तापलं; राज ठाकरेंना निमंत्रण नाही

Balasaheb Thackeray स्मारक भूमिपूजनावरून राजकारण तापलं; राज ठाकरेंना निमंत्रण नाही

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray smarak) यांच्या स्मारकाचं भूमिपूजन सोहळा आज पार पडणार आहे. दादर येथील जुन्हा महापौर निवासात हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.

  मुंबई, 31 मार्च: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं (Balasaheb Thackeray Smarak) भूमिपूजन सोहळा आज पार पडणार आहे. दादर येथील जुन्हा महापौर निवासात हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) उपस्थित राहणार आहेत. मात्र या भूमिपूजन सोहळ्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना निमंत्रण नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मुंबईतील महापौर बंगला स्मारकासाठी हस्तांतरीत करण्यासाठी तेव्हा मुख्यमंत्रिपदावर असलेले देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना निमंत्रण नसल्याने भाजपाने नाराजी व्यक्त केली आहेत. तसेच मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचंही नाव निमंत्रण पत्रिकेत नसणं खरंच चुकीचं असल्याचं मत भाजपा प्रवक्ते अतुल भातखलकर यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट का लिहीलं नाही असा प्रश्नही विचारला आहे. दूसरीकडे मनसे प्रवक्ता संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियाद्वारे शिवसेनेला सुनावलं आहे. 'बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने कोण पुढे घेऊन जात असेल तर राज ठाकरे..मराठी माणसांची हीच भावना आहे. आणि यालाच महत्त्व आहे. बाकी भूमिपूजन कोण करतं याला काही अर्थ नाही' असं टीकास्त्र सोडलं आहे. वाढता वाद पाहता शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनी सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता हा कार्यक्रम ऑनलाइन ठेवल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दोन-तीन जणांना सोडून बाकी सर्व जण हा कार्यक्रम ऑनलाइन पाहू शकतात असं त्यांनी सांगितलं आहे.

  'गुन्ह्याबद्दल माहीत असूनही तुम्ही FIR का नोंदवला नाही?' मुंबई उच्च न्यायालयाने Parambir Singh यांना फटकारले

  सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेनं भाजपाशी फारकत घेत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत घरोबा केला आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं. त्यानंतर गेल्या दीड वर्षात भाजपाने महाविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. आता तर वाझे प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारला भाजपाने सळो की पळो करून सोडले आहे. त्यामुळे भाजपाला या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
  Published by:News18 Digital
  First published:

  Tags: Ajit pawar, Balasaheb thorat, Devendra Fadnavis, Raj Thackeray, Sandeep deshpande, Shivsena, Uddhav tahckeray, Uddhav thackeray

  पुढील बातम्या