मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मातोश्रीवर महिन्याला...' खोक्यांच्या आरोपांवरून शिंदे गटाचा खळबळजनक पलटवार

'मातोश्रीवर महिन्याला...' खोक्यांच्या आरोपांवरून शिंदे गटाचा खळबळजनक पलटवार

महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर विरोधकांकडून शिंदे गटातल्या आमदारांवर जवळपास रोजच खोके सरकार म्हणून आरोप होत आहे. या आरोपांवर आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana, India
  • Published by:  Shreyas

बुलढाणा, 1 ऑक्टोबर : महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर विरोधकांकडून शिंदे गटातल्या आमदारांवर जवळपास रोजच खोके सरकार म्हणून आरोप होत आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तर विरोधकांनी 50 खोके एकदम ओके, अशा घोषणा दिल्या. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही त्यांच्या जवळपास प्रत्येक कार्यक्रमात शिंदे सरकारवर खोके सरकार असा आरोप करत आहेत. या आरोपांवर आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

50 खोके एकदम ओके म्हणताना, शंभर खोके मातोश्री ओके, तेही दर महिन्याला असा खळबळजनक आरोप खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. राज्यात नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून हजर झाले, त्यावेळी शिवसेना खासदार आणि आमदारांनी त्यांचं मेहकरमध्ये स्वागत केलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात शिंदे गटात गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट मातोश्रीलाच लक्ष्य केलं.

रामदास कदमांचाही आरोप

याआधी शिवसेना नेते रामदास कदम यांनीही मातोश्रीवर आरोप केले होते. मातोश्रीवर किती खोके जातात, याची माहिती आहे, आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा इशाराच रामदास कदम यांनी दिला होता.

'मातोश्रीमध्ये किती खोके गेले, किती मिठाई खाल्ली तरी त्यांना डायबिटीस होत नाही, सवय झालेली आहे. अंगवळणी पडलेलं आहे. त्यांनी दुसऱ्यांकडे बोट दाखवून खोक्यांची भाषा वापरावी, यासारखं आश्चर्य कोणतं नाही. मातोश्रीमध्ये किती मिठाईचे खोके गेले ते आम्हाला माहिती आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका,' असं विधान रामदास कदम यांनी केलं होतं.

First published: