मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'ज्यादिवशी माझी मुलाखत होईल, त्यादिवशी...', दसरा मेळाव्याआधी शिंदेंच्या इशाऱ्याचा VIDEO समोर

'ज्यादिवशी माझी मुलाखत होईल, त्यादिवशी...', दसरा मेळाव्याआधी शिंदेंच्या इशाऱ्याचा VIDEO समोर

दसरा मेळाव्याआधी राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दसरा मेळाव्याआधी शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा देत असतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 3 ऑक्टोबर : दसरा मेळाव्याआधी राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिंदे आणि ठाकरे गटाकडून या दसरा मेळाव्याचे ट्रेलर लॉन्च करण्यात येत आहेत. या ट्रेलरमधून दोन्ही गट एकमेकांवर प्रहार करत आहेत. जसजसा दसरा मेळावा जवळ येत आहे, तसा या वादाने टोक गाठलं आहे. ठाण्याचे माजी महापौर आणि शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी एका पाठोपाठ 9 व्हिडिओ ट्वीट केले आहेत. हे सगळे व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचे आहेत.

नरेश म्हस्के यांनी ट्वीट केलेल्या एका व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे गर्भीत इशारा देत आहेत. एकनाथ शिंदे यांचा हा इशारा नेमका उद्धव ठाकरेंना आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

'मी आज जाहीरपणे काही गोष्टी बोलणार नाही, पण योग्यवेळी बोलेन. आता ज्या मुलाखतींचा सपाटा सुरू आहे, ज्या दिवशी मी बोलेन, ज्यादिवशी माझी मुलाखत होईल, त्यादिवशी या राज्यात नाही तर देशामध्ये मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही,' असं एकनाथ शिंदे या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.

म्हस्केंच्या ट्वीटमध्ये काय?

नरेश म्हस्के यांनी दसरा मेळाव्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजवर केलेल्या काही भाषणातील मुद्दे काढून लागोपाठ नऊ ट्वीट केली आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याआधी वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांनी भाषणातील काही अंश ट्विट करून शिवसैनिकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाबद्दल उत्कंठा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

या सर्व वक्तव्यासोबत 'फटकेबाजी सूरु' असे कॅप्शन देण्यात आले आहे. आधी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विसर न व्हावा असे कॅम्पेन रन करून त्यांनीच केलेल्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देण्यात आली होती. त्यानंतर स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पत्र लिहून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनातील वेदना मांडण्याचा प्रयत्न म्हस्के यांनी केला होता.

आता नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्र्यांची भाषणातील वक्तव्ये ट्वीट करून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात काय तर दसरा मेळावा होण्यापूर्वी सोशल मीडियावर देखील त्यांची उत्सुकता वाढावी, यासाठी शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रयत्न केल्याचे या व्हिडिओमधून दिसून येत आहे.

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena, Uddhav Thackeray