मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदे गटाचं लक्ष्य आदित्य ठाकरेंच्या खात्यावर! केसरकरांनी सांगितला खातेवाटपाचा मुहूर्त

शिंदे गटाचं लक्ष्य आदित्य ठाकरेंच्या खात्यावर! केसरकरांनी सांगितला खातेवाटपाचा मुहूर्त

Deepak Kesarkar-Aaditya Thackeray

Deepak Kesarkar-Aaditya Thackeray

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता शिंदे गटाने (CM Eknath Shinde) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या पर्यटन मंत्रालयावर लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं आहे. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी याबाबत भूमिका मांडतानाच खातेवाटपाचा मुहूर्तही सांगितला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 11 ऑगस्ट : 30 जूनला एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर 39 दिवसांनी 9 ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, यात भाजपचे 9 आणि शिंदे गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथविधीला दोन दिवस झाल्यानंतरही अजून खातेवाटप झालेलं नाही. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शपथ घेतलेले मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी खातेवाटपाचा मुहूर्त सांगितला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावाला गेले आहेत, तिकडून आल्यानंतर ते खाती जाहीर करतील, असं केसरकर म्हणाले. मागच्यावेळी शपथ घेतली तेव्हा 48 तासानंतर मला माझं खातं समजलं होतं, पण सुरूवातीला कार्यालय द्यायला हवं, यासाठी काम सुरू आहे, बंगले देखील दिले जातात. सगळ्यांनी बंगले खाली केले का नाही ते मला माहिती नाही. याआधी देखील 35 दिवस झाल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झालं होतं. आम्हाला पण थोडं सहकार्य करा, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली. आदित्य ठाकरेंच्या खात्यावर लक्ष्य दरम्यान शिंदे गटाच्या मंत्र्यांचं आदित्य ठाकरे यांच्या खात्यावर लक्ष्य आहे. अडीच वर्ष त्यांनी पर्यटन खात्याचं काम केलं, पण त्यानंतर आता आम्ही अडीच वर्ष असं काम करू की त्यांना फिरता येणार नाही. आम्ही त्यांच्यावर टीका करत नाही, पण पर्यटन खात्याचं जास्तीत जास्त काम करू, असं आश्वासन केसरकर यांनी दिलं. माझ्याकडे जेवढी माहिती आहे, तेवढी मी या खात्याचा मंत्री बनेल त्याला देईन, असंही दीपक केसरकर यांनी सांगितलं.
First published:

Tags: Aaditya thackeray, Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

पुढील बातम्या