मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मिलिंद नार्वेकर गवळी-नाईकांच्या नवरात्रोत्सवात, फक्त देवीचं दर्शनच नाही, तर हे आहे कारण?

मिलिंद नार्वेकर गवळी-नाईकांच्या नवरात्रोत्सवात, फक्त देवीचं दर्शनच नाही, तर हे आहे कारण?

गणपतीनंतर नवरात्रातही वेगवेगळ्या पक्षांचे नेते मंडळामध्ये दर्शनाला जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे या नेत्यांनी अनेक मंडळांना भेटी दिल्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 3 ऑक्टोबर : गणपतीनंतर नवरात्रातही वेगवेगळ्या पक्षांचे नेते मंडळामध्ये दर्शनाला जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे या नेत्यांनी अनेक मंडळांना भेटी दिल्या. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अष्टमीच्या दिवशी अरुण गवळी आणि अश्विन नाईक यांच्या नवरात्रोत्सवातल्या देवीचं दर्शन घेतलं.

मिलिंद नार्वेकर नवरात्रोत्सवानिमित्त भायखळ्याच्या दगडी चाळीत गेले होते. यावेळी मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेना सचिव आशा अरुण गवळी यांचीही भेट घेतली. दगडी चाळीतल्या गणेशोत्सवासोबतच मिलिंद नार्वेकर अश्विन नाईक यांच्या नवरात्रोत्सवातही देवीचं दर्शन घ्यायला गेले होते, यावेळी त्यांनी अश्विन नाईक यांच्याशीही चर्चा केली.

मुंबई महापालिका निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून कधीही तारखांची घोषणा होऊ शकते. मुंबई महापालिका निवडणुकीत भायखळा आणि वरळी परिसरातल्या मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळेही मिलिंद नार्वेकर यांच्या या भेटींकडे पाहिलं जात आहे.

मिलिंद नार्वेकर चर्चेत

मिलिंद नार्वेकर हे लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चा जोरात सुरू आहेत. मिलिंद नार्वेकर येत्या काळात शिवसेनेत येणार असल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला. उद्धव ठाकरेंच्या गटाकडून मात्र या चर्चा फेटाळून लावण्यात आल्या आहेत.

शिंदे नार्वेकरांच्या घरी

एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवामध्ये मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तेव्हापासून नार्वेकरांच्याबाबत उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत.

कोण आहेत मिलिंद नार्वेकर?

54 वर्षांचे मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचं राजकीय सल्लागार मानले जातात. राज ठाकरे यांनीही शिवसेना सोडताना नार्वेकर यांना जबाबदार धरलं होतं. 2018 साली मिलिंद नार्वेकर यांना शिवसेना सचिव म्हणून घोषित करण्यात आलं होतं. शिवसेनेमध्ये याआधी झालेल्या बंडावेळी अनेकांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप करत शिवसेनेची साथ सोडली होती. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.

First published:

Tags: Shivsena