Home /News /maharashtra /

पूजा चव्हाण प्रकरणावरुन राऊतांनी भाजप नेत्यांना फटकारले, संजय राठोड यांच्याबद्दल म्हणाले...

पूजा चव्हाण प्रकरणावरुन राऊतांनी भाजप नेत्यांना फटकारले, संजय राठोड यांच्याबद्दल म्हणाले...

धनंजय मुंडे यांचा विषय वेगळा आहे. तक्रारदार महिलेने तक्रार मागे घेतली. संजय राठोड यांच्या विषयी बातम्या प्रसिद्ध झाल्या.

    नाशिक, 14 फेब्रुवारी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे(Pooja Chavan suicide case) राजकीय आखाडा तापला आहे. शिवसेना (Shivsena)आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. 'राजकारणात एखाद्या व्यक्तीच्या बळी घेणं, बदनाम करणं असे प्रकार वाढले आहे. यामुळे सरकारला त्रास होईल असं विरोधकांना वाटत आहे. पण विरोधी पक्षाने ठरवलं म्हणून त्या दिशेने चौकशी करायची असं होत नाही' अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी रोखठोक मत व्यक्त केले. 'धनंजय मुंडे यांचा विषय वेगळा आहे. तक्रारदार महिलेने तक्रार मागे घेतली. त्यामुळे सर्व आरोप हे खोटे ठरले होते.  संजय राठोड यांच्या विषयी बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याबद्दल  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पण राजकारणात एखाद्या व्यक्तीच्या बळी घेणं, बदनाम करणं असे प्रकार वाढले आहे. यामुळे सरकारला त्रास होईल असं विरोधकांना वाटत आहे' असा टोला राऊत यांनी लगावला. तसंच, 'संजय राठोड हे विदर्भातील सेनेचे आधारस्तंभ आहे. विदर्भातील ते मोठे नेते आहे. या प्रकरणी विरोधी पक्षाने ठरवलं म्हणून त्या दिशेने चौकशी करायची असं होत नाही, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा नवा खुलासा, अरुण राठोड कुटुंबीयांसोबत झाला गायब 'राज्यपाल शिवसेना शीतयुद्ध नाही हे खुले युद्ध आहे. राजभवनाचा वापर हा सत्तेसाठी होतोय. राजकीय दबावामुळे 12 आमदारांचा वेळ वाया गेला त्याच काय? विमान प्रवासाला परवानगी नाकारण्यात आलेल्या प्रकरणामुळे या युद्धाला सुरुवात झाली असून अशा अनेक घटना युद्धात होतात', असंही राऊत यांनी ठणकावून सांगितले. देशात कोरोना लस घेतलेल्या 27 जणांचा मृत्यू, काय आहे कारण? ' सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी त्यांच्या कारकिर्दीतील घटना समोर आणायला हव्या. रंजन गोगई राज्यसभेच्या खासदार झाल्यापासून आमचाही न्यायालयाबाबत विश्वास राहिला नाही, असंही राऊत म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Sanjay raut

    पुढील बातम्या