छगन भुजबळांच्या प्रवेशावर अखेर शिवसेनेची प्रतिक्रिया, संजय राऊत म्हणाले...

जय राऊत यांनी भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उत्तर दिलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2019 04:14 PM IST

छगन भुजबळांच्या प्रवेशावर अखेर शिवसेनेची प्रतिक्रिया, संजय राऊत म्हणाले...

नाशिक, 4 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र यावर शिवसेना किंवा स्वत: छगन भुजबळ यांच्याकडून मात्र शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. अशातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर भाष्य केलं आहे.

'सध्या राज्यातील राजकारणाचं उत्तर महाराष्ट्र हा केंद्र बिंदू आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांशी आज चर्चा झाली. मी आहे तिथे बरं आहे, असं छगन भुजबळ यांनी स्वतः म्हटलं आहे. त्यामुळे चित्र स्पष्ट आहे. आमच्याकडे काही वॉशिंग मशीन नाही, सगळ्यांना पक्षात घायला. आम्ही पारखून नेत्यांना पक्षप्रवेश देत आहोत,' असं म्हणत संजय राऊत यांनी भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उत्तर दिलं आहे.

युतीबाबत काय म्हणाले संजय राऊत?

- शिवसेनेमध्ये मुलाखत होत नाही, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फक्त बैठका होतात.

- गणेशोत्सव नंतर कधीही निवडणुका लागतील

Loading...

- भाजप राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील इच्छुकांचे मुलाखती घेत आहे, तर आम्ही देखील तयारी करत आहोत.

- आर्थिक मंदीमुळे या देशात बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे रशिया सारखी परिस्थिती होऊ नये.

- आर्थिक मंदीवर सरकारने लवकर उपायोजना कराव्यात.

- काँग्रेस काळात देखील मोठी मंदी आली होती मात्र मनमोहन सिंह यांनी अत्यंत उत्तम काम करून देशाला मंदीतून बाहेर काढलं.

- येणाऱ्या निवडणुकीत जागा वाटप समान होणार. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात ठरलं आहे.

VIDEO: पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी फॉर्म्युला ठरणार, युतीची चर्चा आजपासून सुरू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2019 04:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...