मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आशिष शेलार आदित्य ठाकरेंविरुद्ध वरळीतून लढणार? शिवसेनेचं चॅलेंज

आशिष शेलार आदित्य ठाकरेंविरुद्ध वरळीतून लढणार? शिवसेनेचं चॅलेंज

भाजपने आशिष शेलार (Ashish Shelar) यांना मुंबईचं अध्यक्ष (BJP Mumbai President) केल्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेला अंगावर घ्यायचं ठरवल्याचं दिसत आहे. आदित्य ठाकरेंचा (Aaditya Thackeray) मतदारसंघ असलेल्या वरळीत भाजप दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 18 ऑगस्ट : भाजपने आशिष शेलार (Ashish Shelar) यांना मुंबईचं अध्यक्ष (BJP Mumbai President) केल्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेला अंगावर घ्यायचं ठरवल्याचं दिसत आहे. आदित्य ठाकरेंचा (Aaditya Thackeray) मतदारसंघ असलेल्या वरळीत भाजप दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करणार आहे. वरळीच्या जांभोरी मैदानात (Worli Jambhori Maidan) भाजपने दहीहंडीचं आयोजन केलं आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे एकूण 3 आमदार आहेत. स्वत: आदित्य ठाकरे विधानसभेवर तर सुनिल शिंदे आणि सचिन आहिर विधानपरिषदेवरचे आमदार आहेत. तीन आमदार असूनही वरळीचं जांभोरी मैदान दहीहंडीसाठी मिळवण्यात भाजपला यश आलं. दहीहंडीवेळी शक्तीप्रदर्शन केल्यानंतर आशिष शेलार वरळीतून आदित्य ठाकरेंच्याविरोधात पुढची विधानसभा निवडणूक लढणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेना आमदार सचिन आहिर यांनी आदित्य ठाकरेंना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान केलं आहे. 'वरळीचा थर मजबूत आहे, काळजी करू नका. एवढीच हौस असेल तर वरळीतून लढा. इकडचीच हंडी फोडयाची, असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी स्वत:चा मतदारसंघ बदलावा आणि इकडून लढावं. वरळीकर जनता काय आहे ते दाखवून देईल,' असं सचिन आहिर म्हणाले. आशिष शेलार यांनी त्याआधी ट्विटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला होता. भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे... आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय, भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत... लवकरच.. मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत "करुन दाखवतील" आमचं ठरलंय!! असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं होतं. एकीकडे भाजपने आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या जांभोरी मैदानात दहीहंडीचं आयोजन केलं आहे, तर दुसरीकडे शिवसेनेनं शिवसेना भवनसमोर निष्ठेच्या दहीहंडीचं आयोजन केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गड असलेल्या ठाण्यातही शिंदे आणि शिवसेना यांच्यात दहीहंडीवरून सामना होणार आहे. एकनाथ शिंदेंच्या दहीहंडीशिवाय राजन विचारे यांच्या दहीहंडीनेही अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
First published:

Tags: Aaditya thackeray, Ashish shelar, BJP, Shivsena

पुढील बातम्या