साताऱ्यात उदयनराजेंची डोकेदुखी वाढली; नरेंद्र पाटलांनी माघार घेतली, पण...

भाजपमध्ये दाखल झालेल्या उदयनराजेंसमोर राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांच्या रूपाने आव्हान निर्माण केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2019 01:05 PM IST

साताऱ्यात उदयनराजेंची डोकेदुखी वाढली; नरेंद्र पाटलांनी माघार घेतली, पण...

मुंबई, 5 ऑक्टोबर : उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. भाजपमध्ये दाखल झालेल्या उदयनराजेंसमोर राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांच्या रूपाने आव्हान निर्माण केलं आहे. त्यानंतर आता आणखी एका उमेदवाराने निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने उदयनराजेंची डोकेदुखी वाढली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ हा युतीत पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेकडे होता. मात्र उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता ही जागा भाजपकडे गेली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांनी साताऱ्यातून आता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उभा असलेल्या पुरुषोत्तम जाधव यांनी उदयनराजेंसमोर आव्हान निर्माण केलं होतं.

एकीकडे राष्ट्रवादीने सर्व शक्ती पणाला लावली असताना पुरूषोत्तम जाधव यांनीही निवडणूक रिंगणात उडी घेतली असल्याने उदयनराजेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर लढून उदयनराजेंना भिडणाऱ्या नरेंद्र पाटील यांनी पोटनिवडणुकीत माघार घेतली. मात्र जाधवांच्या उमेदवारीमुळे उदयनराजेंसमोर मतविभाजन होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

उदयनराजेंसमोर राष्ट्रवादीचं आव्हान

'खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक घ्यावी. पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी,' या अटी भाजप प्रवेशावेळी उदयनराजेंनी ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे उदयनराजेंना आपण पराभूत होऊ शकतो, ही भीती आहे का, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

Loading...

दरम्यान, उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या इतर आमदारांशीही उदयनराजेंनी कधी जुळवून घेतलं नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र, शरद पवारांची शिष्टाई कामी आली. पण आता उदयनराजे भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचा मुख्य संघर्ष हा राष्ट्रवादीविरोधात होणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे या लढतीत, हे बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

VIDEO: मोजत बसा! उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेऊन आला 10 रुपयांचे चिल्लर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2019 01:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...