शिवसेनेकडून सोनिया गांधींवर स्तुतीसुमने, अजित पवारांबद्दलही भाष्य

शिवसेनेकडून सोनिया गांधींवर स्तुतीसुमने, अजित पवारांबद्दलही भाष्य

शिवसेनेकडून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत.

  • Share this:

मुंबई, 29 डिसेंबर : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक आघाडीची स्थापना झाली. कधी नव्हे ते शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र आले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखील सरकार स्थापना झाली. त्यानंतर आता शिवसेनेकडून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत.

'राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले. थकलेल्या व आजारी सोनिया गांधी यांना पुन्हा पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे लागले. सोनिया गांधी यांनी वेगळा दृष्टिकोन ठेवला नसता तर महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन घडले नसते,' असं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'चे संपादक संजय राऊत यांनी आपल्या विशेष 'रोखठोक' या सदरात लिहिलं आहे.

शरद पवार-उद्धव ठाकरे एकत्र आल्याने बदलू शकतं देशातील वातावरण, शिवसेनेचा आशावाद

'मावळत्या वर्षात शरद पवार यांचे नेतृत्व उसळून वर आले. 80 वर्षांच्या या राजकीय योद्धय़ाने महाराष्ट्रासारखे राज्य भाजपच्या हाती जाऊ दिले नाही व शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसला सोबत घेऊन त्यांनी ‘आघाडी’चे सरकार स्थापन केले.

'वाईट नेत्याला साथ देणे महाराष्ट्राची चूक', अमृता फडणवीसांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर घणाघात

श्री. पवार यांची प्रकृती उत्तम आहे व महाराष्ट्रातील घडामोडींनी पवारांकडे देशातील विरोधी पक्षाचे नेतृत्व आपसूकच आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी आता राज्याच्या सीमा पार केल्या तर दिल्लीवर महाराष्ट्राचे राजकारण भारी पडेल. बाळासाहेब ठाकरे व शरद पवार हे एकत्र आले असते तर चमत्कार घडला असता. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे एक आहेत व दोघांनी भाजपच्या विरोधात उभे राहण्याचे ठरवले तर संपूर्ण देशातून त्यांना मोठा पाठिंबा मिळेल असे वातावरण आहे,' असा आशावाद संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

कोकणात नारायण राणे आणि शिवसेना आमने-सामने, कोण मारणार बाजी?

'चमचे व राजकीय भजनीबुवांच्या गराडय़ात सत्ता'

संजय राऊत यांनी धार्मिक मुद्द्यांवर होत असलेल्या राजकारणावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. 'धार्मिक उन्माद घडवून देशात अराजक व अराजकातून विघटन होईल. धर्म आणि राजकारणाची गल्लत थांबवायला हवी. धर्म आहेच. जातीही पुसल्या जाणार नाहीत, पण धर्मातीत लोकशाही की धर्मप्रधान हुकूमशाही, या पेचातून देशाला बाहेर काढावे लागेल. चमचे व राजकीय भजनीबुवांच्या गराडय़ात आज सत्ता आहे,' असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

'अजित पवार जास्त प्रगल्भ झाले'

'नवीन वर्ष कसे असेल यावर कुंडल्या मांडल्या जात आहेत. 2018 मावळताना आणि 2019 उगवताना अशाच कुंडल्या मांडल्या गेल्या व एकाही भविष्यवेत्त्याने हे सांगितले नव्हते की, महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल किंवा राज्यात सत्तापरिवर्तन घडेल. पुन्हा श्री. फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील व त्यांच्याशिवाय पर्याय नाही, शिवसेनेला महाराष्ट्रात पुन्हा भारतीय जनता पक्षाचीच चाकरी करावी लागेल असे वातावरण 2019 चे होते. फडणवीसांचे फक्त 80 तासांचे सरकार आले व गेले. जाताना अजित पवारांना जास्त प्रगल्भ बनवून गेले,' असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2019 10:45 AM IST

ताज्या बातम्या