Elec-widget

राष्ट्रवादी आता शिवसेनेलाही देणार धक्का, विद्यमान आमदाराचा लवकरच प्रवेश

राष्ट्रवादी आता शिवसेनेलाही देणार धक्का, विद्यमान आमदाराचा लवकरच प्रवेश

शिवसेनेचे विद्यमान आमदार नाराज झाले असून ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

  • Share this:

पालघर, 3 ऑक्टोबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास वनगा यांना दिलेला शब्द पूर्ण करत त्यांना पालघर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली. पण त्यामुळे विद्यमान आमदार अमित घोडा नाराज झाले असून ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

पालघर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेनं श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे. तसंच वनगा यांना AB फॉर्मही देण्यात आला. त्यामुळे शिवसेनेचे पालघरचे आमदार अमित घोडा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मावळमध्ये भाजपला फटका

निवडणुकीपूर्वी जोरदार इन्कमिंग झाल्यानंतर आता उमेदवारांच्या घोषणेनंतर भाजपला मोठ्या बंडाळीचा सामना करावा लागत आहे. मावळमध्येही भाजपला दोन मोठे धक्के बसले आहेत. पक्षातील एका इच्छुकाने तिकीट न मिळाल्याने थेट राष्ट्रवादीची वाट धरली आहे. तर दुसऱ्या नेत्याने निवडणुकीत अपक्ष उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय जनता पक्षाने मावळमध्ये पुन्हा एकदा राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर विश्वास टाकला. त्यामुळे तिकीट नाकारलेल्या सुनील शेळके यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधलं. सुनील शेळके यांना राष्ट्रवादीने उमेदवारीही दिली आहे. तर दुसरीकडे, तालुक्यात दोन टर्म आमदार असलेले दिगंबर भेगडे यांचा पुतण्या रवींद्र भेगडे यांनाही पक्षाकडून डावललं गेल्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली.

Loading...

माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी पुतण्या रवींद्र भेगडे यांना मावळ मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मावळमध्ये बाळा भेगडे विरुद्ध सुनील शेळके विरुद्ध रवींद्र भेगडे असा तिरंगी समाना रंगणार आहे.

कुणा विरुद्ध कोण लढणार? या आहेत BIG FIGHTS, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 04:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...