शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते एकत्र घेणार राज्यपालांची भेट

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते एकत्र घेणार राज्यपालांची भेट

राज्यातील सत्ता स्थापनेसाठी सुरु असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर महाशिवआघाडीचे नेते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी ही भेट असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर : राज्यात सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या आघाडीची चर्चा सुरु आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असून आता भाजपनेही पुन्हा आमचंच सरकार येईल असं म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याला स्थिर सरकार मिळेल असं वक्तव्य केलं आहे. दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते शनिवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. शुक्रवारी याबाबतची माहिती नवाब मलिक यांनी दिली.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते शनिवारी दुपारी साडेचार वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यामुळे प्रशासकिय यंत्रणेचं कामकाज जवळपास बंदच आहे. त्यातच राज्यात अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यपालांनी पुढाकार घ्यावा यासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितले.

राज्यात जवळपास सर्वच भागातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. मावळत्या सरकारने मदत देण्याचं जाहीर केलं अशलं तरी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाही. उभ्या पिकाचं नुकसान झाल्यामुळं आता दररोजचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा रिहला आहे. त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी करणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

राज्यपालांची भेट जरी सत्ता स्थापनेसाठी सुरु असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर असली तरी त्याबाबतची चर्चा मात्र यावेळी होणार नाही. तरीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र राज्यपालांची भेट घेणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

जेव्हा स्मृती इराणी तलवारबाजी करता, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2019 09:12 AM IST

ताज्या बातम्या