'ब्राह्मण फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं'

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2019 02:02 PM IST

'ब्राह्मण फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं'

बीड, 3 ऑगस्ट : 'ब्राह्मण फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस कायद्याच्या चौकटीत टिकेल असं आरक्षण देऊ शकली नाही,' असं म्हणत माथाडी कामगार नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

नरेंद्र पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना सातारा लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. पण राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा पराभव करणं त्यांना शक्य झालं नाही. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या आधी नरेंद्र पाटील हे पुन्हा एकदा चांगलेच सक्रिय झाले आहेत. बीडमधील पत्रकार परिषदेत नरेंद्र पाटील यांनी सरकारच्या कामगिरीचं कौतुक केलं.

काय म्हणाले नरेंद्र पाटील?

'अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील 6 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना 350 कोटी रुपयांचा कर्ज वाटप केलं आहे. या कर्जाचा परतावादेखील चांगला असून बँकांना सरकार व्याज परतावा देखील देत आहे. या लाभार्थ्यांनी कर्जफेड वेळेत केल्यास त्यांच्यावरील बँकांचा विश्वास देखील वाढेल आणि त्यांना वाढीव कर्ज मिळू शकेल,' असा दावा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे.   

दरम्यान, नरेंद्र पाटील हे दोन दिवस बीड जिल्हा दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी विविध बँकांच्या जिल्हा समन्वयक यांची आढावा बैठक घेतली. तसेच लाभार्थींच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बैठकीसाठी प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण, जिल्हा सहनिबंधक सहकारी संस्था श्री. बडे यासह  जिल्ह्यातील विविध बँकांचे जिल्हा समन्वयक आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Loading...

काळीज पिळवटून टाकणारा VIDEO, नदी ओलांडताना क्षणात वाहून गेल्या गायी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 02:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...