• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • ''नवाब मलिक आतापर्यंत बोलत होते, आता इंटरव्हलनंतर मी सांगणार'', संजय राऊतांचा सूचक इशारा

''नवाब मलिक आतापर्यंत बोलत होते, आता इंटरव्हलनंतर मी सांगणार'', संजय राऊतांचा सूचक इशारा

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर: मुंबईतली क्रूझ ड्रग्स पार्टीवर केलेल्या कारवाईसंदर्भात रोज नवनवे खुलासे होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी केलेल्या आरोपानंतर काल या प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साहिल नवा गौप्यस्फोट केला. आर्यन खानच्या (aryan Khan drug case) सुटकेसाठी शाहरुख खानकडून 25 कोटींची मागणी केल्याचा दावा प्रभाकर साहिलनं केला. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, मनी लाँड्रिंगचं हे प्रकरण असून हा खूप मोठा खेळ आहे. तो आता खेळ सुरु झाला आहे. प्रभाकर साहिलचं कौतूक असून त्याच्या सुरक्षेची मागणी मी सरकारकडे केली आहे. या सगळ्या प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नवाब मलिकांनी या प्रकरणात आतापर्यंत बोलत होते. आता इंटरव्हलनंतरचा स्क्रीनप्ले मी सांगणार आहे, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे. भाजपनं या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यावरही संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आता तुमच्या काळजाला समोरून वार झाला आहे. सीबीआय चौकशी करा,अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे. हेही वाचा- India vs Pakistan: पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचे पडसाद, संतप्त फॅन्सनी फोडले TV, VIDEO VIRAL हा खूप मोठा खेळ असून तो आता खेळ सुरु झाला आहे असं म्हणत प्रभाकर साहिलच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. प्रभाकर साहिल अत्यंत महत्वाचा साक्षीदार आहे त्याची सुरक्षा महत्वाची आहे.मी दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोललो आहे. प्रभाकरने देशावर आणि महाराष्ट्रावर उपकार केलेत. राज्यसरकाने सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे, असं राऊत म्हणालेत. हेही वाचा- कोणालाही समजू न देता पाहता येईल Instagram Story, ही सोपी ट्रिक ठरेल फायदेशीर  किरण गोसावी गायब आहे हे भाजपला माहिती आहे. परमबीर सिंग कुठेय हेही त्यांना माहिती आहे. कारण महाराष्ट्राला बदनाम करण्याची यांनी एकही संधी सोडली नाही आहे, असा आरोपही राऊतांनी केला आहे. तसंच जर काही केले नाही तर घाबरायचं काय कारण आहे. एसआयटी नेमून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असंही राऊत म्हणालेत.
  Published by:Pooja Vichare
  First published: