'महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होणार', संजय राऊत पुन्हा भाजपवर बरसले

'महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होणार', संजय राऊत पुन्हा भाजपवर बरसले

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

मुंबई, 2 नोव्हेंबर : 'भाजपच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी दिली आहे. ही धमकी म्हणजे जनादेशाचा अपमान आहे. राष्ट्रपती कोणाच्या खिश्यात नाही. राष्ट्रपतींना या गोंधळात ओढू नये,' असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे.

'युतीत कोणतीही चर्चा झाली नाही. युतीच्या चर्चेच्या बातम्या खोट्या आहेत. कोणी शपथविधीचा मुहूर्त काढत असेल तर तो मुहूर्त महत्त्वाचा नाही. बहुमताचा मुहूर्त महत्वाचा आहे. महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होईल,' असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सत्ता स्थापनेवरून युतीमध्ये वाद सुरू आहे. भाजप आणि सेनेत पडलेल्या सत्तेच्या ठिणगीमध्ये आता भाजपने 'एकला चलो रे'ची भूमिका मांडली आहे. मंगळवारी 5 नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर भाजपा मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे. शिवसेना सोबत आली तर त्यांच्याबरोबर अन्यथा भाजपाचा एकट्याचा शपथविधी करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.

या शपविधी कार्यक्रमाची सर्व जबाबदारी आमदार प्रसाद लाड आणि चंद्रकांत देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. 2014 प्रमाणेच सत्तास्थापन करण्याची भाजपाची तयारी असल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शपथविधी समारंभ आयोजित करण्याचं निश्चित केलं आहे. हा समारंभ वानखेडे स्टेडियम येथेच पार पडणार आहे.

VIDEO : 'नेत्यांना सुबुद्धी देवो' भाजप-सेनेच्या वादावर अमृता फडणवीस म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 10:31 AM IST

ताज्या बातम्या