मुबई, 18 डिसेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला. हा व्हिडिओ महाविकास आघाडीच्या मोर्चाचा असल्याचं संजय राऊत म्हणाले आहे. पण संजय राऊत यांचा हा व्हिडिओ महाविकास आघाडीच्या मोर्चाचा नसून मराठा मोर्चाचा आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच संजय राऊत अधूनमधून असं करत असतात, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. यानंतर आता संजय राऊत यांनी पुन्हा एक ट्विट करत देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले संजय राऊत -
"मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान.. न्याय्य हक्कांसाठी निघाला.शिवरायांचा जयघोष करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला.तेव्हा देखील आजच्या प्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करीत होते. दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते. तूर्त इतकेच!" असे संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.
मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान.. न्याय्य हक्कांसाठी निघाला.शिवरायांचा जयघोष करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला.तेव्हा देखील आजच्या प्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करीत होते.दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते. तूर्त इतकेच!
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 18, 2022
दरम्यान, संजय राऊतांनी मराठा मोर्चाच्या गर्दीचा व्हिडिओ ट्विट केला, त्याची 'चौकशी करणार' असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावरुन पुन्हा संजय राऊत यांनी ट्विट करत त्यांना प्रत्युत्तर दिले.
जरूर चौकशी करा... मराठा मोर्चा ही सुध्धा महाराष्ट्राची ताकत होती आणि आहे..महविकास आघाडी मोर्चात ही ताकत सहभागी झालीच होती... करा चौकशी! आपल्या चोर कंपनीला clean cheat देणे आणि राजकीय विरोधकांची चौकशी करणे हाच या सरकारचा एक कलमी कार्यक्रम झालाय! डरो मत! https://t.co/JAbSPowyFB
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 18, 2022
हेही वाचा - संजय राऊतांनी ट्वीट केलेला Video महाविकासआघाडीच्या मोर्चाचा नाहीच! फडणवीसांनी पकडली चूक
ते म्हणाले की, "जरूर चौकशी करा... मराठा मोर्चा ही सुध्धा महाराष्ट्राची ताकत होती आणि आहे..महविकास आघाडी मोर्चात ही ताकत सहभागी झालीच होती...करा चौकशी! आपल्या चोर कंपनीला clean cheat देणे आणि राजकीय विरोधकांची चौकशी करणे हाच या सरकारचा एक कलमी कार्यक्रम झालाय! डरो मत!", असे संजय राऊत म्हणाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Maharashtra politics, Maratha kranti morcha, Sanjay raut