मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ओमराजे आणि राणा जगजितसिंह पुन्हा आमनेसामने, उस्मानाबादमध्ये राजकारण तापलं

ओमराजे आणि राणा जगजितसिंह पुन्हा आमनेसामने, उस्मानाबादमध्ये राजकारण तापलं

उस्मानाबाद जिल्ह्यातही राजकारण तापलं असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातही राजकारण तापलं असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातही राजकारण तापलं असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

उस्मानाबाद, 2 ऑगस्ट : दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजपसह मित्रपक्षांनी 1 ऑगस्टपासून आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. मात्र या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय चमकक होत असल्याचं चित्र आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही राजकारण तापलं असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

उस्मानाबादमध्ये दूध दरवाढीच्या आंदोलनावरून राजकारणाला ऊत येत आहे. काल भाजपच्या वतीने तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक कृष्णाला लोणी चारून दूध दरवाढ आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान राणा पाटील यांनी हातात रवी घेत लोणी बनवण्याचाही प्रयत्न केला होता.

याच आंदोलनावरून आता राणा पाटील यांचे चुलत बंधू शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी टीका केली आहे. आंदोलन करणाऱ्यांना दुधातील आणि लोण्यातील फरक तरी कळतो ?अशी टीका पत्रक काढून राणा पाटील यांच्यावर करण्यात आली. जिल्ह्यातील दूधसंघ ज्यांच्यामुळे बंद पडले तेच आता आंदोलन करत आहेत. राज्य सरकारच्या नावाने ओरड करण्यापेक्षा केंद्राकडून मदत आणण्यासाठी प्रयत्न करावे असा सल्ला देत ओमराजे यांनी जिल्ह्यातील आणि राज्यातील भाजप नेत्यांना लक्ष्य केलं आहे.

ओमराजेंच्या या घणाघाती टीकेला भाजपकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावं लागेल.

दरम्यान, भाजप दूध आंदोलनाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरल्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. पश्चिम महाराष्ट्रात सदाभाऊ खोत यांच्या संघटनेनं आक्रमक आंदोलन केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी टीका केली. त्या टीकेला सदाभाऊ खोत यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिल्याने वातावरण तापलं आहे.

First published:
top videos

    Tags: Osmanabad