Home /News /maharashtra /

शिवसेनेला खुली ऑफर, मंत्र्याने राजीनामा देताच भाजप खासदाराने केलं खळबळनक वक्तव्य

शिवसेनेला खुली ऑफर, मंत्र्याने राजीनामा देताच भाजप खासदाराने केलं खळबळनक वक्तव्य

ठाकरे सरकारला पहिला धक्का बसताच भाजपने पुन्हा एकदा संधी साधल्याचं पाहायला मिळत आहे.

  चंद्रकांत फुंदे, पुणे, 4 जानेवारी : शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर भाजपने शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. 'सत्तारानी खरंच राजीनामा दिला असेल तर ही फक्त सुरूवात आहे. नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच पळाला, असाच हा प्रकार,' अशी विखारी टीका भाजप खासदार गिरीश बापट यांनी केली आहे. ' महाविकास आघाडीचं तीन तिघाडी सरकार असंच चालणार असेल तर हे राज्याचं दुर्दैव आहे. आम्ही आजही सेनेला सोबत घ्यायला तयार आहोत पण ही इच्छा त्यांनीही व्यक्त केली पाहिजे,' अशी इच्छाही गिरीश बापट यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला पहिला धक्का बसताच भाजपने पुन्हा एकदा संधी साधल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीबद्दल निलेश साबळेने व्यक्त केलं मत, म्हणाला... गिरीश महाजनांकडून अब्दुल सत्तारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त समोर येताच भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'अब्दुल सत्तार यांचा राजीनामा ही तर सुरुवात आहे. राजीनाम्याची बातमी समोर आल्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांचा फोन बंद येत आहे,' असं गिरीश महाजन म्हणाले आहेत. 'अब्दुल सत्तार हे मुळ शिवसैनिक नाहीत' 'अब्दुल सत्तार हे मुळ शिवसैनिक नाहीत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर जे नेते नाराज दिसत आहेत, ते जुने शिवसैनिक नाहीत. मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला जातो. मात्र असं झालेलं नाही. अब्दुल सत्तार आताच शिवसेनेत आले आहेत, मात्र तरीही त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतलं,' असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: BJP, Uddhav thackeray

  पुढील बातम्या