शिवसेनेच्या माजी केंद्रीय मंत्र्याची भाजपवर घणाघाती टीका

शिवसेनेच्या माजी केंद्रीय मंत्र्याची भाजपवर घणाघाती टीका

अरविंद सावंत यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Share this:

शिर्डी, 15 डिसेंबर : शिवसेनेचे खासदार आणि माजी मंत्री अरविंद सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. 'अगोदरच्या सरकारवर जनता नाराज होती. मात्र आता सर्वसामान्यांचं सरकार आल्याने जनता मोकळा श्वास घेत आहे. पदासाठी शिवसेना कधीच हापापलेली नव्हती. पण भाजपने शब्द पाळला नाही,' असं म्हणत अरविंद सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला.

'राज्यात सत्तेत आलेलं सरकार जनहिताचं काम करण्यासाठी उत्सुक आहे. सामान्य जनता आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून अनेक निर्णय घेतले जात आहेत. गेल्या पाच वर्षात सरकारच्या कामावर जनता नाराज होती. मात्र आता सर्वसामान्य जनतेचं सरकार आलं आहे,' असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावली. अरविंद सावंत हे सपत्नीक साईबाबांच्या आरतीला आणि दर्शनाला उपस्थित होते. आम्ही जरी पाच वर्ष सरकारमध्ये होतो तरी झालेल्या कामाची श्वेतपत्रिका काढायला आम्ही काय घाबरतोय का? असा पलटवार अरविंद सावंत यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

अरविंत सावंत यांचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून मोठा संघर्ष झाला. या संघर्षानंतर शिवसेनेनं भाजपपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेना केंद्रातील मोदी सरकारमधून बाहेर पडली आणि शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला.

Published by: Akshay Shitole
First published: December 15, 2019, 8:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading