मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

''नारोबा राणे''यांच्यामुळे केंद्र सरकारची मान शरमेनं खाली, शिवसेनेचा नारायण राणेंवर बेछुट हल्लाबोल

''नारोबा राणे''यांच्यामुळे केंद्र सरकारची मान शरमेनं खाली, शिवसेनेचा नारायण राणेंवर बेछुट हल्लाबोल

 नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.  त्यामुळे नगरपालिकेची राजकीय समीकरणे बदलली होती.

नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे नगरपालिकेची राजकीय समीकरणे बदलली होती.

आता शिवसेनेची (Shivsena) सर्वात महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 25 ऑगस्ट: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्या केल्यानंतर राज्यभरात भलताच राडा पाहायला मिळाला. शिवसैनिक भलतेच संतापले. यावेळी ठिकठिकाणी आंदोलनासह केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर गुन्हे दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात नारायण राणे यांना रात्री उशीरा जामीन मंजूर झाला. याप्रकरणावर आता शिवसेनेची (Shivsena) सर्वात महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. ती म्हणजे सामनाचा अग्रलेख (saamana Editorial) शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून नारायण राणेंवर टीका करत वाभाडे काढलेत.

भोकं पडलेला फुगा, या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. तसंच नारायण राणे यांचा उल्लेख नारोबा राणे असा करण्यात आला आहे.

काय आहे आजच्या सामनाच्या अग्रलेखात

पंतप्रधान मोदी यांच्या मांडीस मांडी लावून बसणाऱ्या महात्मा नारोबा राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची भाषा केली. पंतप्रधानांच्या बाबतीत कुणं असं विधान केलं असतंतर त्यास देशद्रोहाच्या आरोपाखाली एव्हाना तुरुंगात डांबलेच असते. नारोबा राणे यांचा गुन्हा त्याच पद्धतीचा आहे.

महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य आहे व एका मर्यादेपलीकडे ही बेताल बादशाही खपवून घेतली जाणार नाही हे कृतीनं दाखवून द्यायची हीच वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा बेतालपणा सहन करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांवर हात टाकण्याची भाषा करणारा कोणीही असो त्यांचे हात सध्या तरी कायदेशीर मार्गानं उखडलेलेच बरे!.

जामिनावर सुटका होताच नारायण राणेंची मोजक्याच शब्दात पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

पंतप्रधान मोदींना मारण्याचा नुसता कट रचल्याच्या (?) आरोपाखाली काही विचारवंतांना फडणवीस सरकारनं तुरुंगात सडवलेच आहे. इथे नारोबा राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचीच सुपारी घेतल्याचं दिसत आहे. आता सुपारीबाजांची महाराष्ट्रात आरती ओवळायची काय?

महात्मा नारोबांसारखे भाडोत्री लोक शिवसेनेवर सोडले जात आहेत. या भाडोत्रींनी भाजपलाच नागडे करुन सोडले व आता तोंड लपवून फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. केंद्रीय मंत्री नारोबा राणे यांनी शपथग्रहण केल्यापासून जे दिवे पेटवले व अक्कल पाजळली त्यामुळे केंद्र सरकारची मान शरमेनं खाली झुकली आहे.

First published:

Tags: Narayan rane, Shivsena, Uddhav Thackeray (Politician)