नारायण राणेंच्या घोषणेला शिवसेनेचं जोरदार प्रत्युतर, आमदारानंच दिलं खुलं आव्हान

नारायण राणेंच्या घोषणेला शिवसेनेचं जोरदार प्रत्युतर, आमदारानंच दिलं खुलं आव्हान

मग शिवसेना काय आहे हे तुम्हाला समजेल...

  • Share this:

सिंधुदुर्ग, 4 नोव्हेंबर: 2019 च्या निवडणुकीतून पळ काढणारे भाजप नेते नारायण राणे (BJP MP Narayan Rane) यांनी येत्या 2024 च्या निवडणूक रिंगणात उतरावं, मग शिवसेना काय आहे हे तुम्हाला समजेल, असं खुलं आव्हान आमदार वैभव नाईक (Shiv Sena MLA Vaibhav Naik) यांनी दिलं आहे.

कोकणातील शिवसेनेच्या 11 आमदारांना घरी बसवून शिवसेनेला कोकणातून हद्दपार करण्याची घोषणा खासदार नारायण राणे यांनी केली आहे. या त्यांच्या घोषणेवर आमदार वैभव नाईक  यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा...‘कोरोना’वर मात केल्यानंतर फडणवीसांना डिस्चार्ज, 10 दिवस राहणार होम क्वारंटाईन

शिवसेना आमदार वैभव नाईक म्हणाले, नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे 11 आमदार निवडून येणार नाही, असं आव्हान केलं होतं. ते आव्हान शिवसेनेनं 2014 मध्ये स्वीकारलं होतं. 2014 मध्येच नारायण राणे यांचं आव्हान मोडीत काढलं होतं. विधानसभेत माझ्यासारख्या शिवसैनिकांने त्यांचा पराभव केला. शिवाय त्यानंतर त्यांचा मुलाचाही दोन वेळा सलग पराभव शिवसेना आणि कोकणातील जनतेनं केला, असा टोलाही वैभव नाईक यांनी यावेळी लगावला.

2019 च्या निवडणुकीत काढला होता पळ...

आमदार वैभव नाईक म्हणाले की, 2019 च्या निवडणुकीत नारायण राणे यांनी पळ काढला होता. राणेंना आता 2024 मध्ये निवडणुकीला रिंगणात उतरावं आणि त्यावेळी शिवसेनेचे 11 आमदार येतात की 21 आमदार निवडून येतात, हे तुम्हाला समजेल. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत तुम्ही निवडणुकीला उभे राहाचं, असं खुलं आव्हान दिलं आहे.

राणे पुत्र भाजपमध्ये गेले नसता तर...

नारायण राणे यांचे एक चिरंजिव भाजपमध्ये गेला नसता तर पराभव झाला असता, असा टोला वैभव नाईक यांनी लगावला. नारायण राणे हे शिवसेना संपवण्याची भाषा करतात, मात्र, कोकणात शिवसेना दुप्पट वेगानं वाढत आहे. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे, असं आमदार वैभव नाईक यांनी सांगितलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते नारायण राणे?

आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणातील शिवसेनेच्या 11 आमदारांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवण्यात येतील. कोकणातून शिवसेनेला हद्दपार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता 56 आमदार घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेची संख्या कमी होईल, असा दावाही नारायण राणे यांनी केला होता.

हेही वाचा...65 कैद्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या अधीक्षकाचे कोरोनामुळे निधन

शिवसेनेचे 145 आमदार निवडून आलेले नाहीत, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यामुळे तुमचे आमदार किती असं त्यांना लोक विचारतील. त्यामुळे ते पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत, अशी खोचक टीका नारायण राणेंना केली होती.

Published by: Sandip Parolekar
First published: November 4, 2020, 6:09 PM IST

ताज्या बातम्या