भाजप आमदारासोबत धक्काबुक्की करणाऱ्या शिवसेना आमदाराची पहिली प्रतिक्रिया

भाजप आमदारासोबत धक्काबुक्की करणाऱ्या शिवसेना आमदाराची पहिली प्रतिक्रिया

शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 डिसेंबर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात मोठा गदारोळ झाला. अधिवेशन सुरू असताना शिवसेना आणि भाजपच्या दोन आमदारांमध्ये थेट हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ उडाला होता. ज्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली त्यातील शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'आम्ही विदर्भातून आमदार म्हणून निवडून आलो आहोत. अधिवेशनादरम्यान विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी आमची अपेक्षा होती. मात्र भाजपच्या आमदारांनी गोंधळ घालून कामाकाजात अडथळा आणला. तसंच परवानगी नसताना थेट सभागृहात बॅनर झळकावले. एवढंच नव्हे तर मंत्री महोदय बोलत असताना त्यांच्यासमोरही बॅनर आणले. यामुळे आमचा संताप झाला. यातून ती घटना घडली,' अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.

दरम्यान, विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतकरी प्रश्नावरून चर्चा सुरू असताना शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये थेट हाणामारी झाली आहे. शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं.

सभागृहात दोन आमदारांमध्ये थेट हाणामारी झाल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर सत्तारूढ पक्षाकडून जयंत पाटील आणि भास्कर जाधव आमदारांना समजावलं. तर भाजपकडून आशिष शेलार आणि गिरीश महाजन हे भाजप आमदारांना आवरण्याचा प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2019 12:38 PM IST

ताज्या बातम्या