हायव्होल्टेज बैठकीत अखेर शिवसेना आमदारांचं ठरलं, मुख्यमंत्रिपदाबाबत एकमत!

हायव्होल्टेज बैठकीत अखेर शिवसेना आमदारांचं ठरलं, मुख्यमंत्रिपदाबाबत एकमत!

शिवसेना आमदारांची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती.

  • Share this:

मुंबई, 7 नोव्हेंबर : सत्ता स्थापनेबाबत पेच निर्माण झाल्यानंतर शिवसेना आमदारांची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. 'सत्ता स्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतली तो सर्वांना मान्य असेल,' असा एका ओळीचा ठराव या बैठकीत शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मान्य केला आहे. तसंच शिवसेना मुख्यमंत्रिपदच मिळावं, या मागणीबाबत सर्व आमदारांचं एकमत झालं आहे.

'शिवसेनेचा मुख्यमंत्री होणं हा आमच्यासाठी सर्वोच्च आनंद असेल,' असं शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही मातोश्रीच्या आदेशाचे भुकेलेलो आहोत, असं म्हणत शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी बैठकीनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच या बैठकीनंतर सर्व शिवसेना आमदारांना रंगशारदा हॉटेल इथं जाण्याचा आदेश पक्षाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळातही मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आक्रमकच राहणार अशी स्थिती आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर आक्रमक झालेली शिवसेना अजूनही शांत झालेली नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असं शिवसेना नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. बहुमतासाठी लागणाऱ्या 144 जागांपासून भाजप मागील निवडणुकीच्या तुलनेत जास्तच दूर राहिल्याने शिवसेनेनं संधी साधली आहे. मात्र भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेला त्यांचे आमदार फुटण्याची भीती सतावत असल्याचं दिसत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. नवीन आमदारांना पैशाचं आमिष दाखवून भाजप आपल्याकडे खेचेल, अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात असल्याचं बोललं जात आहे. कर्नाटकात कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यानंतर घोडाबाजाराला ऊत आला होता. अनेक पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शिवसेना सतर्क झाली आहे. म्हणूनच शिवसेना आमदारांना एका ठिकाणी ठेवलं जाण्याची शक्यता आहे.

VIDEO : काँग्रेसचाही प्लॅन तयार, 'या' नेत्याने केला मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2019 01:49 PM IST

ताज्या बातम्या