मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राजन साळवी शिंदे गटात जाणार? कुजबूज सुरू झाल्यानंतर दिलं स्पष्टीकरण

राजन साळवी शिंदे गटात जाणार? कुजबूज सुरू झाल्यानंतर दिलं स्पष्टीकरण

कोकणातला शिवसेनेचा (Shivsena) एक आमदार लवकरच एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटात जाणार असून उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आणखी एक धक्का बसेल, अशी चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 19 ऑगस्ट : एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसमोर (Shivsena) इतिहासातलं सगळ्यात मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 40 आणि 10 अपक्ष अशा एकूण 50 आमदारांनी पाठिंबा दिला, त्यामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकासआघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार घेऊन गेल्यानंतर आता 41वा आमदारही शिंदेंकडे जायच्या तयारीत असल्याचं वृत्त येऊ लागलं. शिंदेंकडे जाणारा हा आमदार कोकणातला असल्याचं बोललं जाऊ लागलं, त्यामुळे शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या नावावरून कुजबूज सुरू झाली. आता स्वत: राजन साळवी यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आमची निष्ठा मातोश्री कायम चरणी.... काल आज व उद्या फक्त आमची निष्ठा शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे फक्त... असं राजन साळवी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. या ट्वीटमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसोबतचा फोटो जोडला आहे. या ट्वीटनंतर काही वेळातच राजन साळवी यांनी दुसरं ट्वीट केलं. निष्ठेचे प्रमाणपत्र दि.15 ऑक्टोबर 2002 साली हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे ह्यांनी दिले मला खोक्याची गरज नाही, असा टोलाही राजन साळवी यांनी हाणला. या ट्वीटसोबत त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंसोबतचा आपला एक फोटोही जोडला. कोकणातल्या आमदाराची चर्चा एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता कोकणात उद्धव ठाकरेंसोबत फक्त तीन आमदार शिल्लक आहेत. यामध्या राजन साळवी, भास्कर जाधव आणि वैभव नाईक यांचा समावेश आहे. यातला एक आमदार दोनच दिवसांमध्ये शिंदे गटात सामील होईल. या आमदाराने फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीची भेट घेतली आहे, असं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं.
First published:

Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

पुढील बातम्या