मोबाईल बंदी ते निष्ठेची शपथ...शिवसेना आमदारांच्या हायव्होल्टेज बैठकीतील 5 मोठे मुद्दे

आमदारांसमोर पुढील दिशा स्पष्ट करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 12:34 PM IST

मोबाईल बंदी ते निष्ठेची शपथ...शिवसेना आमदारांच्या हायव्होल्टेज बैठकीतील 5 मोठे मुद्दे

मुंबई, 7 नोव्हेंबर : राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक मातोश्री इथं बोलावण्यात आली आहे. भाजपला कडवं आव्हान दिल्यानंतर आमदारांसमोर पुढील दिशा स्पष्ट करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर आक्रमक झालेली शिवसेना अजूनही शांत झालेली नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असं शिवसेना नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. बहुमतासाठी लागणाऱ्या 144 जागांपासून भाजप मागील निवडणुकीच्या तुलनेत जास्तच दूर राहिल्याने शिवसेनेनं संधी साधली आहे. मात्र भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेला त्यांचे आमदार फुटण्याची भीती सतावत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शिवसेना आमदारांच्या बैठकीत काय होणार?

1. शिवसेनेच्या सर्व आमदारांना निष्ठेची शपथ देण्यात येणार असल्याचं कळतंय.

2. निष्ठेची शपथ दिल्यानंतर शिवसेना आमदारांची रवानगी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होण्याची शक्यता.

Loading...

3. प्रत्येक आमदाराची जबाबदारी त्या त्या ठिकाणच्या विभागप्रमुखाकडे दिली जाणार. आमदारासोबत विभागप्रमुख आणि स्थानिक शिवसैनिक उपस्थित असणार.

4. आमदारांच्या फोन कॉलवर विभागप्रमुखांचं लक्ष असणार

5. आमदार कोणासोबत बोलत आहेत, किती वेळ बोलत आहेत, याची माहिती मातोश्रीवर दिली जाणार.

शिवसेनेला आमदार फुटण्याची भीती?

बैठकीनंतर शिवसेना आपल्या आमदारांना हॉटेल ट्रायडंट इथं हलवण्याची शक्यता आहे. तसंच याआधीही शिवसेनेनं आपल्या काही आमदारांना याच हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती आहे. नवीन आमदारांना पैशाचं आमिष दाखवून भाजप आपल्याकडे खेचेल, अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात असल्याचं बोललं जात आहे.

कर्नाटकात कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यानंतर घोडाबाजाराला ऊत आला होता. अनेक पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शिवसेना सतर्क झाली आहे. म्हणूनच शिवसेना आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं जाण्याची शक्यता आहे.

VIDEO : काँग्रेसचाही प्लॅन तयार, 'या' नेत्याने केला मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 12:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...