मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'माझी कारकीर्द डरकाळी फोडूनच संपेल', भास्कर जाधवांचे भाजप नेत्याला जोरदार प्रत्युत्तर VIDEO

'माझी कारकीर्द डरकाळी फोडूनच संपेल', भास्कर जाधवांचे भाजप नेत्याला जोरदार प्रत्युत्तर VIDEO

काही दिवसांपूर्वी शरद पवारांचा झेंडा घेतला आणि आता हे कडवट शिवसैनिक झालेत, असा टोलाही दरेकरांनी भास्कर जाधव यांना लगावला होता.

काही दिवसांपूर्वी शरद पवारांचा झेंडा घेतला आणि आता हे कडवट शिवसैनिक झालेत, असा टोलाही दरेकरांनी भास्कर जाधव यांना लगावला होता.

काही दिवसांपूर्वी शरद पवारांचा झेंडा घेतला आणि आता हे कडवट शिवसैनिक झालेत, असा टोलाही दरेकरांनी भास्कर जाधव यांना लगावला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chiplun, India

रत्नागिरी, 21 ऑक्टोबर : आज चिपळूणमध्ये रेल्वे स्टेशनवर आमदार भास्कर जाधव यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हजारो कार्यकर्ते चिपळूण रेल्वे स्थानकात दाखल झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहून भास्कर जाधव भावूक झाले होते.

प्रविण दरेकरांनी केली होती भास्कर जाधव यांच्यावर टीका -

नारायण राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोकणचा विकास होत आहे. त्याला रोखण्याचं काम भास्कर जाधव, वैभव करताहेत, असा आरोप भाजपचे प्रवीण दरेकर यांनी केला होता. तसेच वैभव नाईक यांना समर्थन देण्यासाठी चिपळूणवरून नाचे आले होते, अशी टीकाही त्यांनी केली होती.

तसेच काही दिवसांपूर्वी शरद पवारांचा झेंडा घेतला आणि आता हे कडवट शिवसैनिक झालेत, असा टोलाही दरेकरांनी भास्कर जाधव यांना लगावला होता. तुम्ही पुन्हा कसं निवडून येता हे आता आम्ही बघतोच, असे आव्हानही दरेकरांनी भास्कर जाधव यांना दिले होते. त्यावर आता भास्कर जाधव यांनी दरेकरांना प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव -

राज्यात फिरून आक्रमकपणे भुमिका मांडत असल्यामुळे तरुणांसह वडीलधारी मंडळी शिवसेनेसोबत आहे. सध्याची शिवसेना जुन्या सेनेप्रमाने आक्रमक आहे. आमच्या झेंड्याला कोणी हात लावला तर त्याचे हात तोडण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे, असेही ते म्हणाले. 'भास्कर जाधवची कारकीर्द डरकाळी फोडूनच संपेल', या जोरदार शब्दात भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या टीकेला भास्कर जाधव यांनी हे प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, आज चिपळूणमध्ये रेल्वे स्टेशनवर आमदार भास्कर जाधव यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हजारो कार्यकर्ते चिपळूण रेल्वे स्थानकात दाखल झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहून भास्कर जाधव भावूक झाले होते.

First published:

Tags: Bhaskar jadhav, Chiplun, Pravin darekar