Elec-widget

'शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचं डोकं फोडू', नेत्याची थेट धमकी

'शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचं डोकं फोडू', नेत्याची थेट धमकी

सत्तास्थापनेसाठी महाराष्ट्रात घोडाबाजार होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबतचा पेच अद्यापही सुटू शकलेला नाही. कोणत्याही पक्षाला बहुमताचा जादुई आकडा गाठणं अद्यापर्यंत शक्य झालेलं नाही. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी महाराष्ट्रात घोडाबाजार होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. अशातच शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. याबद्दल बोलताना शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

'महाशिवआघाडीच्या सत्तास्थापनेला मुहूर्त मिळाला आहे. लवकरच राज्यात नवं सरकार येईल. शिवसेना आमदारांची शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत आमची पुढील रणनीती ठरेल. पण शिवसेनेचा आमदार फोडण्याचा कुणी प्रयत्न केला तर आम्ही त्याचं डोकं फोडू. लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या कोणत्याही पक्षाने असं करू नये. आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न कोणत्याही पक्षाने आणि कोणत्याही नेत्याने केला तरीही आम्ही त्याचं डोकं फोडू. फक्त डोकंच नाही तर हात-पायही तोडू,' अशी थेट धमकी अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

शिवसेनेचे आमदार नाराज असल्याची चर्चा

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं भाजपविरुद्ध निर्णायक लढाई छेडली. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सलगी केली आहे. मात्र शिवसेनेतील 17 आमदार पक्षाच्या या निर्णयावर नाराज असल्याची माहिती आहे. शिवसेनेनं हिंदुत्त्वाचा मुद्दा सोडण्यावरून या आमदारांमध्ये नाराजी असल्याचं कळतंय. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी या नाराज आमदारांना घेऊन मातोश्रीवर दाखल झाले आहेत. सध्या या नाराज आमदारांची समजूत काढण्यात येत असल्याची माहिती आहे.

नाराज आमदार पश्चिम महाराष्ट्रातील?

Loading...

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यावरून मतभेद असलेले शिवसेनेचे आमदार हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातील आहेत. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा पट्टा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या आमदारांनी स्थानिक समीकरणं लक्षात घेऊन हा विरोध केला आहे का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

VIDEO : पोशिंद्याला जेसीबीनं चिरडलं, तर दुसरीकडे म्हशीला दिलं जीवदान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: shivsena
First Published: Nov 20, 2019 04:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...