भास्कर मेहरे, (प्रतिनिधी)
यवतमाळ, 13 मे- विदर्भातील शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा डॉन चित्रपटातील 'खैके पान बनारसे वाला..' या गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सध्या महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मंत्र्याला जिल्ह्यात फिरून आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, संजय राठोड दुष्काळ विसरून लग्न मंडपात गाण्यावर ठेका धरत आहे. लग्न समारंभात नाचणे हे त्यांना जरी आनंद देत असले तरी जनतेला मात्र चांगलेच खटकले आहे. ग्रामीण भागात काही प्रमाणात संजय राठोड यांच्या डान्सवरून त्यांच्यावर टीकाही होताना दिसत आहे तर तरुणवर्गात मात्र यावर चवीने चर्चा सुरू झाली आहे.
पाण्यासाठी सगळीकडे हाहाकार उडाला आहे. नागरिकांची पाण्यासाठी भटकांती सुरू आहे. मात्र, प्रशासनकडून आवश्यक ती खरबरदारी घेतल्या जात नाही. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढला. दुष्काळी स्थितीचा विचार करता मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी लावून धरली होती. त्यांनतर ती काही प्रमाणात शिथिल करण्यात आली. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेत मंत्र्यांना मतदार संघात फिरण्याचे आदेश दिले आहेत.
बीड जिल्ह्याच्या दुष्काळ दौऱ्यात काय म्हणाले शरद पवार? पाहा हा VIDEO