'आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका', शिवसैनिकांनीच उद्धव ठाकरेंना रक्ताने लिहिलं पत्र

'आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका', शिवसैनिकांनीच उद्धव ठाकरेंना रक्ताने लिहिलं पत्र

आमच्यावर आत्महत्याची वेळ येऊ नये अशी विनंतीदेखील शिवसैनिकांनी या पत्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

  • Share this:

विजय कमळे पाटील, प्रतिनिधी

जालना, 28 ऑक्टोबर : जालन्यातील काही शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना रक्ताने पत्र लिहलं आहे. घनसांगवी मतदारसंघातील शिवसैनिकांनी रस्क्ताने पत्र लिहित उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. आमच्यावर आत्महत्याची वेळ येऊ नये अशी विनंतीदेखील शिवसैनिकांनी या पत्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी केले आहे. विवेक ढाकणे, मन्सूर शेख, गणेश कोल्हे अशी पत्र लिहणाऱ्या शिवसैनिकांची नावं आहेत.

घनसांगवी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. ते गेल्या 30 वर्षांपासून तालुक्यांमध्ये संघटन मजबूत करत आहेत. मात्र, याहीवर्षी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे उढाण यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं यासाठी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना रक्ताने पत्र लिहलं आहे.

शिवसैनिकांनी रक्ताने लिहलेल्या या पत्रावर आता उद्धव ठाकरे या भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. आमच्या बापाचे आणि आमचे आयुष्य पक्षासाठी काम करण्यात गेलं. त्यामुळे आमच्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नका असंही या पत्रामध्ये लिहण्यात आलं आहे. तर पत्राच्या शेवटी बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असं लिहण्यात आलं आहे.

दरम्यान, भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळूनही सत्ता स्थापनेबाबत अजुनही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. भाजपला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्याने शिवसेनेचे बळ वाढले असून शिवसेना सत्तेत समसमान वाटा मागत असल्याने मोठा अडसर निर्माण झालाय. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे भाजपचे श्रेष्ठी नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळेच भाजपकडून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही अशीही माहिती आहे. शिवसेनेने वाचाळ नेत्यांना आवर घालावा अशी भाजपश्रेष्ठींची भूमिका आहे. अशीच वक्तव्य येत राहिली तर पुढच्या वाटाघाटी अडचणीत येऊ शकतात असे संकेतही भाजपने दिले आहेत.

शिवसेना नेत्यांच्या वाचाळ भूमिकेमुळे अमित शाह यांच्या मातोश्री भेटीवर प्रश्नचिन्ही निर्माण होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य उद्धव ठाकरेंची अधिकृत भूमिका आहे का असा सवाल भाजपने केलाय.संजय राऊत अनेकवेळा काहीतरी बोलतात आणि पुढे ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे असं म्हणत शिवसेना त्यांच्यापासून फारकत घेते.

दरम्यान महायुतीतला मित्रपक्ष असलेला रिपब्लिकन पक्षाने भाजप आणि सेना एकत्र येऊन सरकार स्थापन करतील असं म्हटलंय. रामदास आठवले म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ नेतेपदी निवड होईल असा विश्वास आहे. आठवले पुढे म्हणाले, दोघांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. सेना लिखित आश्वासन मागते आहे त्याबाबत भाजप विचार करेल. शिवसेनेपेक्षा भाजपकडे दुप्पट आमदार आहेत. अमित शहा मुंबईत आले की, उध्दव ठाकरे यांना भेटतील. फडणवीस आणि ठाकरे यांना एकत्र बसवून निर्णय घेतील असंही आठवले म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2019 05:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading