शिवसेनेच्या पीक-पाणी परिषदेला महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनीच मारली दांडी

शिवसेनेच्या पीक-पाणी परिषदेला महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनीच मारली दांडी

शिवसेनेनं पीक पाणी परिषद घेतली आणि विचार मंथन घडवून आणले.

  • Share this:

औरंगाबाद, 20 फेब्रुवारी : उन्हाळा सुरू झाला की मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाच्या बैठका परिषदा सुरू होतात. मागच्या आठवड्यात भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी सर्वपक्षीय लोक प्रतिनिधींची बैठक बोलावली. या बैठकीला फक्त भाजपच्या लोक प्रतिनिधी यांनी उपस्थिती लावली. तर इतर पक्षाच्या लोक प्रतिनिधींनी दांडी मारली. आज शिवसेनेनं पीक पाणी परिषद घेतली आणि विचार मंथन घडवून आणले.

शिवसेनेच्या आजच्या परिषदेला महाविकास आघाडीचे काही मंत्री आणि आमदार उपस्थित राहिले, तर इतर पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी दांडी मारली. इतर पक्षाच्या लोक प्रतिनिधींनी दांडी मारली असताना महाविकास आघाडीच्याच मराठवाड्यातील मंत्र्यांनी सुद्धा दांडी मारली. परिषदेचे उद्घाटन औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार होते. त्यांनी अचानक दांडी मारल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते उदघाटन उरकले.

ज्या लातूरला सर्वात जास्त भीषण पाणी टंचाई दरवर्षी जाणवते, त्या लातूरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी सुद्धा या परिषदेला दांडी मारली. परळीचे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंढे यांनीही परिषदेकडे पाठ फिरवली. शिवसेनेचे पैठणचे आमदार आणि राज्य मंत्री संदीपने भुमरे हे सुद्धा परिषदेला उपस्थित राहिले नाहीत.

तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल, राज ठाकरे यांच्या मनसेचा MIM ला इशारा

महाविकास आघाडीच्या सरकारमधील पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे तर जाणून बुजून उपस्थित राहिले नाहीत, अशी चर्चा आहे. कारण समान पाणी वाटपाबद्दल मराठवाड्याचा रोष पश्चिम महाराष्ट्रावर आधीपासून आहे. मराठवाडा हा कायम दुर्लक्षित राहिला याला कारण मराठवाड्यातील राजकीय नेतृत्व आहे. कारण मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर सर्वपक्षीय नेतृत्व एकत्र येणार नाही तो पर्यंत मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकत नाही, असं सर्वसामन्यांकडून बोललं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2020 09:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading