शिवसेना वाढवणार अमित शहांची डोकेदुखी, महत्त्वाकांक्षी विधेयकाला करणार विरोध

शिवसेना वाढवणार अमित शहांची डोकेदुखी, महत्त्वाकांक्षी विधेयकाला करणार विरोध

शिवसेना अमित शहा यांची डोकेदुखी वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 डिसेंबर : दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे आता हे विधेयक मुंजरीसाठी लोकसभा आणि राज्यसभेत मांडलं जाणार आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं महत्त्वाकांक्षी विधेयक असल्याचं बोललं जातं. मात्र याप्रकरणी शिवसेना अमित शहा यांची डोकेदुखी वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आता हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडलं जाणार आहे. लोकसभेत भाजपला बहुमत असल्याने तिथे हे विधेयक मंजूर घेण्यात सरकारला यश मिळेल. मात्र राज्यसभेत बहुमत नसल्याने नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करून घेताना भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण शिवसेना या विधेयकाच्या विरोधात भूमिका घेणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रातील समीकरणांचा दिल्लीत परिणाम

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणं बदलून गेली. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत मोठा वाद झाला आणि हे दोन्ही पक्ष वेगळे झाले. एवढेच नव्हे तर शिवसेनेनं आपले केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनाही सरकारमधून बाहेर पडायला लावलं. त्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. मात्र सत्ता स्थापन करण्यापूर्वी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. यामध्ये कलम 370 यासह नागरिकत्व सुधारणा विधेयकाचाही समावेश असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवरच आता शिवसेना या विधेयकाला संसदेत विरोध करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तिसऱ्या दिवशी गृहमंत्री अमित शाहा यांनी मोठी घोषणा केली होती. संपूर्ण देशभर राष्ट्रीय नागरिक नोंदणी उपक्रम (NRC)राबवणार असल्याचं त्यांनी राज्यसभेत सांगितलं होतं. NRC ची प्रक्रिया कुठल्याही धर्माच्या आधारावर केली जाणार नाही. धार्मिक, वांशिक भेदाभेद यामध्ये नसतील, असंही अमित शहा यांनी स्पष्ट केलं होतं.

NRC वर राज्यसभेत चर्चा सुरू असताना अमित शहा यांनी ही घोषणा केली होती. "धर्माधारित नागरिक नोंदणी करणं या NRC मध्ये अपेक्षित नाही. ज्यावेळी देशभर NRC करण्यात येईल, त्यावेळी पुन्हा एकदा आसाममध्येही ही प्रक्रिया होईल. कुठल्याही धर्माच्या नागरिकांना NRC पासून धोका नाही. त्यामुळे त्यांनी या प्रक्रियेला घाबरून जाऊ नये. सर्व समूहांना NRC अंतर्गत सामावून घेण्याची व्यवस्था आहे," अशी माहिती अमित शहांनी राज्यसभेला दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2019 02:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading