'...सफर में मजा आता है', संजय राऊत यांचे सूचक ट्विट

'...सफर में मजा आता है', संजय राऊत यांचे सूचक ट्विट

शिवसेना नेते संजय राऊत राज्यपालांची भेट घेणार आहेत. राज्यातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या भेटीनंतर काय होणार याकडे लक्ष लागलं आहे.

  • Share this:

मुंबई, 4 नोव्हेंबर : निवडणुकीच्या निकालानंतर 10 दिवस उलटून गेले तरी राज्यात सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. भाजप-शिवसेनेमध्ये अद्याप चर्चाच सुरू आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसली आहे. तर भाजप त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. यामुळे दोन्ही पक्षात तणाव निर्माण झाला आहे. यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आतापर्यंत पत्रकार परिषदेतून भाजपला थेट इशाराच दिला आहे. शिवतिर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. दरम्यान, सोमवारी संजय राऊत राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी केलेल्या ट्विटने पुन्हा नव्या चर्चेला उधाण आलं आहे.

संजय राऊत यांनी ट्विटरवर उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअऱ केला आहे. जय हिंद असा कॅप्शन दिला आहे. तसेच फोटोवर 'लक्ष्य तक पहुंचने से पहले सफर में मजा आता है!' असं लिहिलं आहे. आतापर्यंत शिवसेनेनं त्यांची भूमिका ठामपणे मांडली आहे. आता काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. संजय राऊत यांनी राज्यपालांच्या भेटीआधी फोटो शेअर केल्यानं राज्याच्या राजकारणातील सत्ता स्थापनेची वाटचाल कशी होणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

सत्तास्थापनेची प्रक्रिया सुरू व्हावी, अशी मागणी शिवसेनेकडून राज्यपालांकडे करण्यात येणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज (सोमवारी)राज्यपालांची भेट घेणार आहेत. संजय राऊत हे शिवसेनेच्या वतीने सत्तास्थापनेचा दावा करणार नाहीत. मात्र घटनेनुसार सर्वात मोठ्या पक्षाला आमंत्रण द्या अशी मागणी ते राज्यपालांकडे करणार आहेत. त्यानंतर राज्यपालांनी सर्वाधिक 105 जागा मिळवलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिल्यास भाजपची अडचण होऊ शकते. कारण विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरीही भाजपला स्वबळावर 145 हा बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. हेच संख्याबळ लक्षात घेता शिवसेनेनं ही खेळी खेळली आहे.

राज्यातील सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला सुरुवात करावी या मागणीसाठी राज्यापालांशी ते भेटणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेले काही दिवस शिवसेनेकडून भाजपवर डागण्यात येणाऱ्या तोफगोळ्यांची जबाबदारी राऊत हे सांभाळत आहेत. त्यांच्या अनेक वक्तव्यांनी भाजपला घायाळ केलं असून राऊत दररोज नवनवीन दावे करत असल्याने मोठी कोंडी निर्माण झाली आहे. शिवसेनेकडे 170 आमदारांचं बहुमत असून शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेईल असं वक्तव्य त्यांनी रविवारी केलं होतं त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी राज्यपालांची भेट घेणं महत्त्वाचं मानलं जात आहे.

वाचा : सत्ता स्थापनेपासून ते अवकाळी पावसापर्यंत या आहेत 10 महत्त्वाच्या बातम्या

दरम्यान, 'सामना' दैनिक आणि पत्रकार परिषदांमधून रोज भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांचा खरपूस समाचार 'नागपूर तरुण भारत'च्या अग्रलेखातून आज घेण्यात आलेला आहे. पुराणातील विक्रम आणि वेताळ या कथेचा संदर्भ देत संजय राऊत यांचा उल्लेख नाव न घेता 'बेताल' असा करण्यात आला आहे. तसंच विदूषक अशीदेखील त्यांची संभावना करत संजय राऊत हे राज्यात महायुतीचे सरकार आणण्यास आडकाठी ठरत असल्याची टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

संजय राऊत घेणार राज्यपालांची भेट, सत्तास्थापनेसाठी देणार 'हा' प्रस्ताव

'राज्यात दोन तृतीयांश शेतकरी नैसर्गिक आपत्तीने पीडित असताना आणि त्यांचे दुःख वेदना अहंकाराच्या गर्तेत अडकत असताना महाराष्ट्रही तितकाच हवालदिल होतोय. यासाठी महाराष्ट्र शिवसेनेला कधीही माफ करणार नाही हे ही तितकच जळजळीत वास्तव आहे' असे अग्रलेखात म्हटलं आहे. 'उद्धव ठाकरे यांची राजकीय समज त्यांची परिपक्वता समंजसपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या विकासासाठी पोटतिडिकीने काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांशी असलेले त्यांचे घट्ट भावनिक ऋणानुबंध हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक असताना बेताल शिवसेनेच्या छाताडावर बसल्याचे चित्र अनेकांसाठी वेदनादायी आहे' अशी टीका अग्रलेखातून करण्यात आलेली आहे.

VIDEO : आता म्हणताय येऊ का? अजित पवारांनी कार्यकर्त्यांना बजावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2019 10:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading