'वाघाच्या गळ्यात घड्याळ आणि हातात कमळ', निकालानंतर शिवसेना नेत्याचे ट्विट चर्चेत

भाजपला बहुमताचा आकडा गाठता न आल्यानं शिवसेनेची साथ घेऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहे. आता दोन्ही पक्षांत 50-50 च्या फॉर्मुल्यावर चर्चा झाल्यानंतर पुढचा निर्णय होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 25, 2019 01:24 PM IST

'वाघाच्या गळ्यात घड्याळ आणि हातात कमळ', निकालानंतर शिवसेना नेत्याचे ट्विट चर्चेत

मुंबई, 25 ऑक्टोबर : महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार पुन्हा येणार आहे. पण दोन्ही पक्षांनी गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागा जिंकल्या आहेत. भाजपला बहुमताचा आकडा गाठता न आल्यानं आता त्यांना शिवसेनेच्या भूमिकेवर पुढची वाटचाल करावी लागणार आहे. यात शिवसेना म्हणेल तसं सरकारला चालावं लागेल. सध्या दोन्ही पक्षांमध्ये 50-50 फॉर्म्युल्यावर चर्चा होईल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. व्हायरल होत असलेल्या व्यंगचित्राला शेअर करताना म्हटलं आहे की, व्यंग चित्रकाराची कमाल! बुरा न मानो दिवाली है. व्यंगचित्रात वाघाच्या हातात कमळाचे फूल दाखवण्यात आलं असून त्याच्या गळ्यातील घड्याळाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देतील अशी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्यंगचित्राचा अर्थ काय? याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. शिवसेना नेहमीच स्वत:ला वाघ म्हणून दाखवत असते. तर त्या वाघाच्या गळ्यात दाखवलेलं घड्याळ हे राष्ट्रवादीचं चिन्ह आहे. दुसरीकडे हातात भाजपचे चिन्ह कमळ दाखवलं आहे.

भाजपकड़े बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आवश्यक संख्याबळ नाही. जर भाजपने मनाप्रमाणे सत्तेत वाटा दिला नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे असा इशारा तर राऊत यांनी दिला नाही ना असं म्हटलं जात आहे. तरीही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेसोबत सत्ता नाहीच असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिवसेनेला भाजपसोबत सत्तेत राहण्यावाचून पर्याय नाही.

Loading...

VIDEO : जेसीबी घेऊन उधळला गुलाल, सेनेच्या मंत्र्याला पराभूत केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते जल्लोष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 01:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...