अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेचा घणाघात

अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेचा घणाघात

'अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. भाजपने त्यांना तसं करण्यास भाग पाडलं आहे.'

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर : राष्ट्रवादीतला एक मोठा गट फोडून अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी घणाघाती हल्लाबोल केला आहे. 'अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. भाजपने त्यांना तसं करण्यास भाग पाडलं आहे,' अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

'शरद पवार हे अजित पवारांच्या निर्णयासोबत नाहीत. अजित पवारांनी शरद पवारांच्याही पाठीत खंजीर खुपसला आहे,' असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

शरद पवार नाराज

'अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे,' असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी फुटली, हे आता स्पष्ट झालं आहे.

भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या मदतीने त्यांनी हे सरकार स्थापन केलं आहे. अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

या सगळ्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीकडून फक्त अजित पवार कुटुंब दिसलं आहे. राष्ट्रवादीचे इतर कोणतेही नेते किंवा स्वत: शरद पवार हे यावेळी कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीतला एक मोठा गट फोडून अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जेव्हा या सगळ्या घटनाक्रमाबद्दल प्रतिक्रिया देतील, तेव्हाच याबाबतची स्पष्ट होऊ शकणार आहे.

अजित पवारांनी दिली माहिती

महिनाभर नुसतं चर्चेचं गुऱ्हार चालू होतं मात्र त्यामधून कोणताही तोडगा निघत नव्हता. त्यामुळे स्थिर सरकार स्थापन कसं होणार हा प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जो माझ्यावर विश्वास दाखवून मला जी जबाबदारी दिली आहे ती निश्चितपणे चांगल्यापद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 23, 2019, 10:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading