'मला नुकताच संजय राऊतांचा मेसेज आला', अजित पवारांचा गौप्यस्फोट

'मला नुकताच संजय राऊतांचा मेसेज आला', अजित पवारांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

  • Share this:

मुंबई, 3 नोव्हेंबर : 'मला नुकताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा संदेश आला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत असल्याने मी त्यावर उत्तर दिलं नव्हतं. त्यांना मला का संदेश पाठवला याबाबत मला माहीत नाही. मात्र आता मी फोन करून त्यांच्याशी बोलणार आहे,' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

'जय महाराष्ट्र, मी संजय राऊत,' अशा आशयाचा मेसेज अजित पवार यांनी भर पत्रकार परिषदेत वाचून दाखवला. त्यामुळे भाजपसोबत तणावाचे संबंध निर्माण झालेली शिवसेना राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे का, या चर्चांनी आता आणखीनच वेग पकडला आहे.

'संजय राऊत यांची 170 मॅजिक फिगर कोठून आणली मला माहिती नाही. सोनिया गांधी आणि पवार साहेब यांच्या बैठकीत नेमकं काय ठरतं, त्यावर पुढील गणित ठरेल,' असंही अजित पवार म्हणाले. त्यामुळे आता शरद पवार यांच्या दिल्ली भेटीत नेमक्या काय घडामोडी होतात, यावर राज्यातील सत्तास्थापनेचं गणित ठरण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांनी घेतली आहे पवारांची भेट

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपवर टीका करत आहेत. तसंच त्यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जवळकीची चर्चा होत आहे.

परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, पाहा GROUND REPORT

First published: November 3, 2019, 2:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading