सातारा मतदारसंघात शिवसेना उदयनराजेंना साथ देणार? संजय राऊतांनी दिलं उत्तर

सातारा पोटनिवडणुकीची घोषणा झाली असून ही निवडणूक विधानसभेसोबतच होईल, यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2019 12:31 PM IST

सातारा मतदारसंघात शिवसेना उदयनराजेंना साथ देणार? संजय राऊतांनी दिलं उत्तर

मुंबई, 24 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होणार की नाही, याबाबत गेल्या काही दिवसांत मोठी चर्चा सुरू होती. मात्र आज अखेर सातारा पोटनिवडणुकीची घोषणा झाली असून ही निवडणूक विधानसभेसोबतच होईल, यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

युतीत सातारा हा मतदारसंघ याआधी आपल्याकडे असणारी शिवसेना भाजपच्या तिकीटावर लढणाऱ्या उदयनराजेंना पाठिंबा देणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. याबाबत आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

'सातारा लोकसभेच्या विद्यमान खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता ताणतणाव कशा करता करायचा. नंतर पाहूया. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत परत जागांचं वाटप होईल. मग साताऱ्याच्या बदल्यात काय घेता येईल ते पाहू. आधी उदयनराजे भोसले यांना निवडणूक लढवूद्यात. त्यांना जिंकून येऊद्यात. त्यानंतरचा निकाल आहे तो. सध्या निवडणुक तर होऊद्यात. 'ही युती आहे, युतीमध्ये काय भूमिका असणार,' असं म्हणत संजय राऊत यांनी या पोटनिवडणूक शिवसेना उदयनराजेंना समर्थन देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

उदयनराजेंना दिलासा

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसोबतच ही पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या जागेसाठीही 21 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होईल.

Loading...

साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर साताऱ्यासह इतर भागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. 'सर्वांचा विरोध असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट दिलं. जनतेनंही उदयनराजेंच्या बाजूने कौल दिला. मग त्यांनी आता अवघ्या तीन महिन्यात पक्ष का सोडला,' असा प्रश्न राष्ट्रवादीकडून विचारला जात आहे.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर शरद पवार यांनी रविवारी पहिल्यांदाच साताऱ्यात दाखल होत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात शरद पवारांचं स्वागत केलं. शरद पवारांच्या स्वागताला साताऱ्यात झालेल्या गर्दीनंतर उदयनराजेंसमोर मोठं राजकीय आव्हान उभं राहिलं आहे, अशी चर्चा आहे.

निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली, पण त्यावेळी उदयनराजेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीची मात्र घोषणा केली नाही. उदयनराजेंसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात होतं. कारण विधानसभेसोबत साताऱ्यातील पोटनिवडणूक घेण्यात यावी, अशी अट भाजप प्रवेशावेळी उदयनराजेंनी ठेवल्याचं सांगितलं जातं. मात्र आता उदयनराजेंसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. सातारा लोकसभेची पोटनिवडणूक ही विधानसभेसोबतच होणार आहे.

VIDEO: पिंपरीत तृतीयपंथीय उमेदवाराला विधानसभेची संधी, पाहा महत्त्वाच्या टॉप18 न्यूज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 12:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...