मध्यस्थीचा प्रयत्न करणाऱ्या संभाजी भिडेंना शिवसेनेनं फटकारलं, संजय राऊत म्हणाले...

मध्यस्थीचा प्रयत्न करणाऱ्या संभाजी भिडेंना शिवसेनेनं फटकारलं, संजय राऊत म्हणाले...

संजय राऊत यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना फटकारलं आहे.

  • Share this:

मुंबई, 8 नोव्हेंबर : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सत्तास्थापनेच्या मुद्द्यावर भाजपला लक्ष्य केलं आहे. 'राष्ट्रपती राजवटीच्या आडून राजकारण हा राज्यातील जनतेचा अपमान आहे,' अशी टीका भाजपवर संजय राऊत यांनी केली आहे. तसंच मध्यस्थीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनाही फटकारलं आहे.

'शिवसेनेला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. सर्व कथित आणि तथाकथित मध्यस्थांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप आहे की कुणीही मध्यस्थी करू नये. हा विषय भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमधला आहे, यात तिसऱ्याने मधे पडण्याची गरज नाही,' असं म्हणत संजय राऊत यांनी संभाजी भिडे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.

दरम्यान, राज्यात सध्या शिवसेना-भाजपमध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे. या सगळ्या धामधुमीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे हे मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. मात्र उद्धव ठाकरे यांची भेट न घेताच संभाजी भिडे यांना मातोश्रीवरून काढता पाय घ्यावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी भिडे यांनी उद्धव ठाकरे यांची वाट पाहिली पण ते मातोश्रीवर न परतल्यामुळे संभाजी भिडे तिथून निघून गेले.

उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी संभाजी भिडे हे मातोश्रीवर आले होते. 20 मिनिटं ते त्यांची वाट पाहत होते. मात्र, उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर नसल्यामुळे त्यांची भेट झाली नाही. उद्धव ठाकरे वेळेत न परतल्यामुळे संभाजी भिडे चर्चा न करताच निघाले. 20 मिनिटं वाट बघूनही उद्धव ठाकरेंची भेट न झाल्यामुळे संभाजी भिडे रिकाम्या हाती मातोश्रीवरून निघाले. दरम्यान, भिडे गुरूजी हे अचानक मातोश्रीवर आले त्यावेळेस उद्धव ठाकरे हे घरी नव्हते. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही, असं शिवप्रतिष्ठानकडून सांगण्यात आलं आहे.

VIDEO : शिवसेनेसोबत चर्चा झाली का? जयंत पाटलांचा खुलासा

First published: November 8, 2019, 10:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading