Home /News /maharashtra /

मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावताच, शिवसेनेनं सुनावलं विरोधी पक्षाला; म्हणाले...

मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावताच, शिवसेनेनं सुनावलं विरोधी पक्षाला; म्हणाले...

मुख्यमंत्र्यांनी सर्जरीनंतर जवळपास अडीच महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

  मुंबई, 26 जानेवारी: प्रजासत्ताकाच्या (Republic Day) दिनानिमित्ताने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्जरीनंतर जवळपास अडीच महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी विरोधकांवर टीका केली आहे. विरोधी पक्षात नामर्दानगी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सध्याचा विरोधी पक्ष कोत्यावृत्तीचाय असल्याचंही ते म्हणालेत. चंद्रकांत पाटलांची प्रार्थना कोणत्या मानसिकतेची होती हे वेगळं सांगायला नको. विरोधी पक्षानं एकप्रकारची नामर्दानगी आणली आहे. मोठ्या मनाच्या राजकारणाचा विरोधी पक्षांकडून ऱ्हास होत आहे. नामर्दानही हा शब्द भाजपाने आणला आहे म्हणून मी तो शब्द वापरत आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. जळालेल्या गाडीत आढळला पालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह विरोधी पक्षानं 'उघडा डोळे बघा नीट' अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल अनेकांनी नामर्दपणानं टिका केली. या नामर्दपणाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. ते आता ज्या पद्धतीनं लोककार्यक्रमात सहभागी होऊ लागलेत. एका आजारी व्यक्तीबद्दल बोलताना विरोधकांच्या मनातील कचरा समोर आलाय, असे संजय राऊत यांनी म्हटले. मुख्यमंत्री सर्जरीनंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते. नाराज कार्यकर्त्यांना कसं खूश करायचं?, बिझी अजित पवारांनी सांगितलं सिक्रेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जवळपास अडीच महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावली आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महापौर किशोरी पेडणेकर, बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी स्पाइन सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: BJP, Sanjay Raut (Politician), Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या