Elec-widget

भाजपच्या सत्तास्थापनेसाठी राणेंचा प्रयत्न, संजय राऊत म्हणतात...

भाजपच्या सत्तास्थापनेसाठी राणेंचा प्रयत्न, संजय राऊत म्हणतात...

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत राज्यातील संभाव्य आघाडीच्या चर्चेबद्दल माहिती दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत राज्यातील संभाव्य आघाडीच्या चर्चेबद्दल माहिती दिली आहे. 'किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरू आहे. फॉर्म्युल्याची चिंता कुणी करू नये. राज्याच्या हितासाठी आघाडीकडून एकसूत्री कार्यक्रम देणार आहोत. राज्यात शिवसेनेच्याच नेतृत्वात सरकार बनणार आहे,' असं विश्वास संजय राऊत यांनी बोलून दाखवला. त्याचवेळी त्यांनी भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्याबद्दलही भाष्य केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं. त्यानंतर सत्तास्थापनेच्या नाट्यात नारायण राणे यांनी एण्ट्री घेतली होती. 'भाजप सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सरकार स्थापन करण्यासाठी जे जे काही करत येईल ते ते करणार, असं राणेंनी स्पष्टपणे सांगितलं. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली ही दुर्दैवी बाब आहे. फडणवीस यांनी सरकार स्थापन करण्याच्या कामाला लागा असं मला सांगितलं आहे. आम्ही जेव्हा राज्यपालांकडे जावू तेव्हा खाली हाताने जाणार नाही, आमच्याकडे 145 जागांचं बहुमत असेल', असा दावा राणेंनी केला होता.

नारायण राणेंच्या या दाव्याबद्दल विचारलं असता संजय राऊत आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, 'ज्याच्याकडे बहुमत आहे त्याने सरकार स्थापन करावं. त्यांना शुभेच्छा.' दरम्यान, भाजपच्या सत्तास्थापनेसाठी नारायण राणे नेमक्या कोणत्या पक्षाचे आमदार भाजपकडे खेचण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा करत आहेत, याबाबत स्पष्टता नाही.

राज्यातल्या सत्ता संघर्षावर हे मीम्स तुम्ही पाहिलेत का? पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2019 10:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...