शरद पवार मुख्यमंत्री होणार? संजय राऊत म्हणतात...

युतीत सुरू असलेला छुपा संघर्ष निवडणूक निकालानंतर चव्हाट्यावर आला.

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 12:10 PM IST

शरद पवार मुख्यमंत्री होणार? संजय राऊत म्हणतात...

मुंबई, 3 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. युतीत लढलेल्या भाजप आणि शिवसेनेत मोठा सत्तासंघर्ष सुरू आहे. कोणत्याही एका पक्षाला जादुई आकडा गाठणं शक्य झालं नसलं तरीही भाजप आणि शिवसेना युतीला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिलं. मात्र युतीत सुरू असलेला छुपा संघर्ष निवडणूक निकालानंतर चव्हाट्यावर आला. मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांमध्ये जुंपली आहे. अशातच राज्यात एका वेगळ्याच समीकरणाची चर्चा रंगत आहे.

'राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल तर काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद येईल. या सरकारला शिवसेना बाहेरून पाठिंबा देईल,' असा खळबळजनक दावा शिवसेनेच्या एका नेत्याने केला आहे. शिवसेना नेत्याकडूनच असा दावा करण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीकडून कोणाला मिळणार संधी?

राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल, हा शिवसेना नेत्याने केलेला दावा जर खरा ठरला तर राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदासाठी नक्की कुणाला संधी देणार, याची उत्सुकता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असल्याचं वृत्त शनिवारी एका मराठी वृत्तवाहिनीने दिलं होतं. मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.

'शरद पवार यांनी यापूर्वीच स्पष केलं आहे की ते दिल्लीत गेल्यानंतर आता महाराष्ट्रात परणार नाहीत. त्यामुळे ते परत राज्यात येणार,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर नेमकं कोण बसणार, याबाबत अजूनही संभ्रमाचं वातावरण आहे.

Loading...

संजय राऊतांचा हल्लाबोल

'सत्तेचं गणित जमलं की आम्ही माध्यमांसमोर मांडणार आहोत. पण आता अंतिम निर्णयापर्यंत उद्धव ठाकरे आले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल. ऑपरेशन कमळ महाराष्ट्रात चालणार नाही. काही दिवसांत शिवतीर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल,' असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पलटी मारली म्हणून चर्चा थांबली. आता चर्चा मुख्यमंत्रिपदावरच होईल. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी निकालानंतर महाराष्ट्राकडे लक्ष दिलं नाही. चर्चेबाबत शहांनी पुढाकार घेतला नाही. कारण त्यांनी ही जबाबदारी राज्यातील नेतृत्वाकडे दिली आहे. हरियाणाचा तिढा सुटला, मग महाराष्ट्राचा का सुटला नाही?' असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं.

परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, पाहा GROUND REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 12:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...