शिवसेनेचा सूर बदलला, संजय राऊतांचं नवं वक्तव्य

सत्तास्थापनेत आता शिवसेनेनं नरमाईची भूमिका घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2019 07:21 PM IST

शिवसेनेचा सूर बदलला, संजय राऊतांचं नवं वक्तव्य

मुंबई, 30 ऑक्टोबर : विधानसभा निवडणूक निकालानंतर आक्रमक भूमिका घेतलेल्या शिवसेनेचा सूर बदलल्याचं चित्र आहे. सत्तास्थापनेत आता शिवसेनेनं नरमाईची भूमिका घेतली आहे. सत्तेतल्या समसमान वाट्यासाठी शिवसेना आग्रही नसल्याचं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

'सत्तास्थापनेत घाई करुन चालणार नाही. थंड डोक्यानं विचार करावा लागेल,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 'सर्व काही ठरल्याप्रमाणे व्हावं,' असं संजय राऊत यांनी म्हणत थेटपणे कोणत्या पदावर भाष्य करणं टाळलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना आग्रही मागणी करत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

'ज्याच्याकडे 145 चा आकडा त्याने मुख्यमंत्री व्हावं'

शिवसेनेला दूर ठेवून भाजपने अपक्षांच्या साथीने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास शिवसेनेची भूमिका काय असणार, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, 'ज्या कोणाला 145 हा जादुई आकडा गाठता येत असेल त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. त्यांचं आम्ही अभिनंदन करू.'

'शिवसेनेचे आमदार फुटणार नाहीत'

Loading...

शिवसेनेचे 23 आमदार संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. याबाबत बोलताना संजय राऊत काहीसे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. 'यापुढे महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचा एकही आमदार फुटेल असं मला वाटत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा भाजपचा आमदार फुटणार नाही. शिवसेनेचा तर प्रश्नच नाही,' असं संजय राऊत म्हणाले.

'ठरलं ते झालं नाही तर...',युतीसंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 07:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...