'शिवसेनेकडे भाजपला पर्याय उपलब्ध', संजय राऊतांचा खळबळजनक दावा आणि 25 ठळक मुद्दे

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 04:09 PM IST

'शिवसेनेकडे भाजपला पर्याय उपलब्ध', संजय राऊतांचा खळबळजनक दावा आणि 25 ठळक मुद्दे

मुंबई, 7 नोव्हेंबर : 'शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भाजपला लक्ष्य केलं आहे. जनतेला वेठीस धरण्याचं काम भाजपने करु नये. बहुमत नसेल तर सरळ सांगा, सत्ता स्थापन करू शकत नाही. शिवसेनेकडे पर्याय उपलब्ध आहे. आम्ही सभागृहात बहुमत सिद्ध करू,' असं म्हणत संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली आहे.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील 25 ठळक मुद्दे:

- महायुतीला जनादेश मिळाला आहे, तर सरकार स्थापन करा

- कोणत्याही आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवलेलं नाही

- धमक्या आणि ब्लॅकमेलिंग आता चालणार नाही

Loading...

- साम, दाम, दंड, भेद हा सत्तेचा माज असलेलेच वापरतात

- मुनगंटीवार लाडवाची किती जेवणं घालतात माहीत नाही

- गेल्यावेळी (2014) परिस्थिती वेगळी होती आणि आता (2019) वेगळी आहे.

- आता पोलीस आणि इतर बळाचा वापर करता येत नाही.

- 8 तारखेनंतर मुळात सरकारच नसेल

- भाजपकडून राज्यावर राष्ट्रपती राजवट लादण्याचं पाप

- कुणाचेच सरकार बनू नये अशी भाजपची चाल

- भाजपनं जाहीर करावे आमच्याकडे बहुमत नाही

- भाजपनं जाहीर केल्यास आम्ही विचार करू

- भाजपकडूने घटनात्मक पेच निर्माण करण्याचा प्रत्यन सुरु

- युती तोडण्याचं काम उद्धव ठाकरे करणार नाहीत

- भाजप सत्तास्थापनेचा दावा का करत नाही, हेच कळत नाही

-शिवसनेच्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला नाही

-शिवसेनेकडे आणखी वेगळे ही पर्याय आहे

-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाला जनमत मिळालं आहे

- ठरल्याप्रमाणे करा, या मंत्रालाच जनादेश मिळाला आहे

-शिवसेना कुणाच्या आशेवर नाही

- जर ते म्हणतात की जनादेश युतीला मिळाला आहे. तर त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा का केला नाही?

- जनादेश युतीला मिळालं तर त्यांनी ठरलंय ते करावं

- यापुढे महाराष्ट्राचं नेतृत्व शिवसेनाचं करेल

- मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल

- देवेंद्र फडणवीस हे जर त्यांच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्याचा चेहरा असेल तर त्यांनी बहुमत सिद्ध करावं आणि सरकार चालवावं

VIDEO : काँग्रेसचाही प्लॅन तयार, 'या' नेत्याने केला मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 04:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...