मनसेनं हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतला असतानाच संजय राऊत यांची मोठी घोषणा

मनसेनं हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतला असतानाच संजय राऊत यांची मोठी घोषणा

हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून आगामी काळात शिवसेना आणि मनसेमध्ये सामना होणार असल्याचं दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जानेवारी : 'राम मंदिराचा मुद्दा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत रामजन्मभूमीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. तसंच शरयू नदीची आरतीही करणार,' अशी माहिती शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून आगामी काळात शिवसेना आणि मनसेमध्ये सामना होणार असल्याचं दिसत आहे. कारण महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्ष ज्वलंत हिंदुत्त्वाचा पुरस्कार करत असल्याचं पाहायला मिळतं. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना करत मराठीचा मुद्दा अजेंड्यावर ठेवला होता. मात्र त्यांनीही आता आपला मोर्चा हिंदुत्त्वाकडे वळवला आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यामुळे पुन्हा एकदा या दोन पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याआधी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रथम अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी सर्व देशाचं लक्ष शिवसेनेच्या या दौऱ्याने वेधून घेतलं होतं. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतरही सर्व विजयी खासदारांसह उद्धव ठाकरे अयोध्येत राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. आता विधानसभा निवडणुकी नंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर तिसऱ्यांदा अयोध्येत राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत.

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत शिवसेनेनं सत्ता स्थापन केली असली तरी आक्रमक हिंदुत्व सोडलेलं नाही, हेच दाखवण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा अयोध्येत जात असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे.

सुरू झाला वार आणि पलटवार

'मनसेप्रमुखांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका व त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडलेली मते मेळ खात नाहीत. भाजपची शिवसेनाद्वेषाची मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे व हे त्यांचे खेळ जुनेच आहेत,' असं म्हणत शिवसेनेनं राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर मनसे नेते आणि संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर पलटवार केला.

भीमा कोरेगाव हिंसेची चौकशी करणार NIA, केंद्राच्या निर्णयावर ठाकरे सरकार नाराज

'आधुनिक अफजल खानानी मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. नेमकं त्याच गोष्टीवर राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत्यात. काळजी करू नका आम्हीच उपचार करू,' अशी विखारी टीका संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केली आहे. त्यामुळे आगामी काळातही शिवसेना आणि मनसे आमने-सामने येणार असल्याचं दिसत आहे.

First published: January 25, 2020, 10:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading