Elec-widget

संजय राऊतांनी घेतली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भेट, राजकीय चर्चांना उधाण

संजय राऊतांनी घेतली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भेट, राजकीय चर्चांना उधाण

संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 11 ऑक्टोबर : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भेट घेतली आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले नाशिक पूर्वचे उमेदवार बाळासाहेब सानप यांची संजय राऊत यांनी भेट घेतली. या भेटीने नाशिकमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

बाळासाहेब सानप हे नाशिक पूर्वचे विद्यमान आमदार आहेत. मात्र भाजपने तिकीट न दिल्याने त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. सानप यांच्या समर्थनार्थ नाशिकमधील भाजपच्या तब्बल 14 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात युतीची डोकेदुखी वाढली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राष्ट्रवादीकडून उभा असलेल्या सानप यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे.

नाशिक पूर्वमध्ये कसा रंगणार सामना?

- राहुल ढिकले (भाजप) Vs बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी)

- राहुल ढिकले मनसेतून भाजपात

Loading...

-विद्यमान भाजप आमदार बाळासाहेब सानप राष्ट्रवादीत

- मनसे उमेदवार अशोक मुर्तडक यांची माघार

- मनसे आणी राष्ट्रवादी यांची छुपी युती असल्याची चर्चा

भाजपने मनसेला दिला धक्का

भाजपने नाशिक पूर्वमधून मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांना भाजपने उमेदवारी दिली. राहुल ढिकले हे माजी खासदार उत्तमराव ढिकले यांचे पुत्र आहेत. निवडणुकीच्या घोषणेनंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना नाशिक पूर्वमधून उमेदवारीही जाहीर करण्यात आली.

मंत्री होण्यासाठी एकाने 20 कोटी मोजले, अजित पवारांची UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 11:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...