Elec-widget

शस्त्रक्रियेनंतर सत्तासंघर्षावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

शस्त्रक्रियेनंतर सत्तासंघर्षावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

शस्त्रक्रियेनंतर संजय राऊत यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : 'महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. तीन पक्ष पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. त्यामुळे समान कृती कार्यक्रम आखण्यासाठी ठरावीक वेळ लागणारच. मात्र आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ,' अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर संजय राऊत यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्तावाटपावरून भाजपवर शिवसेनेकडून पहिली तोफ खासदार संजय राऊत यांनी डागली. त्यानंतर सातत्याने ते समसमान सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल करत राहिले. भाजपकडून मुख्यमंत्रिपद देण्यास नकार आल्यानंतर अखेर शिवसेनेनं त्यांच्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर ऐन मोक्याच्या क्षणी संजय राऊत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता शस्त्रक्रियेनंतर संजय राऊत पुन्हा एकदा शिवसेनेच्या मिशन मुख्यमंत्रीसाठी मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत.

दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून राज्यात सत्ता संघर्ष सुरू होता. शेवटी कोणीच सरकार स्थापन करू न शकल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्याला मंजूरी मिळाल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. गृह मंत्रालयाने म्हटलं की, ही घोषणा संविधानाच्या कलम 356(1) नुसार करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आता राष्ट्रपती राजवट लागू होईल. हा निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या अहवालानंतर घेण्यात आला. यामध्ये कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्यास समर्थ नाही असं म्हटलं होतं.

गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी CNN News18 शी बोलताना सांगितलं की, राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी सर्व प्रयत्न आणि शक्यता पाहिल्या. मात्र कोणालाही यश मिळालं नाही. त्यानंतर ज्यावेळी राज्यात स्थिर सरकार स्थापन होण्याची शक्यता दिसली नाही तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आली. दुसऱ्या बाजूला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने यावरून राज्यपालांवर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला मगंळवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत वेळ असतानाही त्याआधीच राष्ट्रपती राजवटीची घाई का असा प्रश्न विचारला गेला. काँग्रेस नेते आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं की, राष्ट्रपति राजवट हा शेवटचा पर्याय असतो. ज्यावेळी एखादा पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही असं म्हणतो तेव्हा दुसरा पक्ष आम्ही तयार करू शकतो पण वेळ द्या असं म्हणतो. मात्र, तो दिला जात नाही.

Loading...

शिवसेनेचा नेमका गेम कुणी केला? पडद्यामागे नेमकं काय घडतंय? पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2019 01:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...