Elec-widget

'आम्ही व्यापारी नाही', शिवसेनेचा अमित शहांवर पलटवार

'आम्ही व्यापारी नाही', शिवसेनेचा अमित शहांवर पलटवार

संजय राऊत यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर : 'राजकारणात किमान नैतिकतेची अपेक्षा आहे. सुरू असलेली नैतिकता नाही. अमित शहा हे लोकसभा निवडणुका होईपर्यंत का बोलले नाहीत की समसमान सत्तावाटपाचं काही ठरलं नाही. आम्ही व्यापारी नाही. आम्ही शब्दाला जागतो,' असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

'निवडणूक काळातच आम्ही वारंवार सांगत होतो की देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, तेव्हा शिवसेना का बोलली नाही,' असा सवाल अमित शहा यांनी केला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शहा यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. तसंच कोणीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जाणीवपूर्वक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

'आम्हाला पंतप्रधानांना खोटं पाडायचं नव्हतं. आम्ही असत्याचा आधार घेऊन कधी राजकारण केलं नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत सत्तावाटपाच्या गोष्टी ठरल्या. बंद दरवाजाआडची चर्चा शाहांनी मोदींना सांगितली नाही. शिवसेनेनं कधी राजकारणाचा व्यापार केला नाही. बंद दरवाजाआड दिलेली आश्वासनं जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हाच ती उघड होतात. आम्ही पंतप्रधानांचा नेहमीच आदर केला आणि करत राहाणार बंद दराआडच्या फॉर्म्युल्याच्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत,' असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये फूट पडली. अखेर या प्रकरणावर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपली भूमिका मांडली. अडीच वर्ष देण्याचा कोणताही प्रस्ताव नव्हता, असं शहांनी स्पष्ट केलं. तसंच त्यांनी शिवसेनेला ओपन चॅलेंजही दिलं आहे.

Loading...

नवी दिल्लीत अमित शहा यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये युतीच्या नाट्यावर आपली रोखठोक भूमिका मांडली. आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अजूनही सरकार स्थापन करता येऊ शकते. परंतु, दुसरीकडे शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू केली आहे. जर त्यांच्याकडे संख्याबळ असेल तर त्यांनी खुशाल सरकार स्थापन करावे, असं थेट आव्हानच अमित शहा यांनी सेनेला दिलं.

शिवसेनेनं अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. पण, ती पूर्ण करणे शक्य नाही, असंही शहा म्हणाले.

राज्यपाल यांनी 18 दिवसांचा वेळ दिला होता. आतापर्यंत कोणत्याही राज्यात राज्यपालांनी इतका वेळ दिला नाही. असं सांगत त्यांनी राज्यपालांची भूमिका योग्यचं असल्याचंही ठणकावून सांगितलं.

BREAKING VIDEO : अजित पवार नाराज झाले का? जितेंद्र आव्हाडांनी दिलं स्पष्टीकरण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2019 10:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com