Home /News /maharashtra /

Sanjay Raut Shiv sena : काय झाडी... काय डोंगर.... काय हाटील, राज्यात काय स्मशान हाय संजय राऊतांनी घेतला चांगलाच समाचार

Sanjay Raut Shiv sena : काय झाडी... काय डोंगर.... काय हाटील, राज्यात काय स्मशान हाय संजय राऊतांनी घेतला चांगलाच समाचार

सांगोला विधानसभा मतदार संघातील (sangola mla shahajibapu patil) आमदार शहाजीबापू पाटील यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

  मुंबई, 26 जून : “काय झाडी... काय डोंगर.... काय हाटील.... एकदम ओके!' हे शब्द अवघ्या तीन दिवसांत राज्यात फेमस झाले. हे शब्द आहेत सांगोला विधानसभा मतदार संघातील (sangola mla shahajibapu patil) आमदार शहाजीबापू पाटील यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. शहाजीबापू पाटील यांनी एकनाथ शिंदे (shiv sena eknath shinde) गटाला मिळाल्यानंतर तालुक्यातील माहिती घेण्यासाठी त्यांनी फोन केला होता त्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे त्याबाबत संजय राऊत (shiv sena sanjay raut) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

  या ऑडिओ क्लिपमध्ये ते त्यांच्या नेहमीच्या गावरान स्टाईलमध्ये बोलताना दिसतात. यावेळी त्यांनी म्हटलेले, “काय झाडी... काय डोंगर.... काय हाटील.... एकदम ओके!' या शब्दांनी तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा शब्द धरून नेटकऱ्यांनी देखील काही मजेदार मीम्स शेअर करण्यास सुरूवात केली आहे. त्यातच आता शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आमदार शहाजीबापूंच्या त्या मजेशीर विधानाचा कडक भाषेत समाचार घेत महाराष्ट्र मे श्मशान है क्या? असे म्हणत टोला लगावला आहे.

  हे ही वाचा : 'आना ही पडेंगा चौपाटी में...' संजय राऊतांचा आठवले स्टाईल शिंदे गटाला खोचक टोला

  संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा पुन्हा समाचार घेतला. ते म्हणाले की, आता बंडखोरांमध्येही फूट पडणार आहे, काही आमदारांशी संपर्क झाला आहे. त्यांना पुन्हा पक्षात घेतले जाऊ शकते, असे संकेत दिले.

  शिवसेनेची युवा शाखा 'युवासेना'च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक आहे. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. दादर येथील शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे. कालच संजय राऊत यांनी शिवसेनेच्या 7 बंडखोर मंत्र्यांना पदावरून हटवण्याचे संकेत दिले होते.

  हे ही वाचा : एकनाथ शिंदेंना गटनेतेपदाचा मोह सुटेना, नव्या ट्वीटमधून शिवसेनेला डिवचलं

  कोण आहेत शहाजीबापू पाटील...

  शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी असताना ते वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी व्हायचे. त्यानंतर पुढे ते राजकारणात सक्रिय झाले. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत युवा काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवली. सांगोला विधानसभा मतदारसंघाकडून त्यांना यासाठी उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत त्यांना यश मिळालं नाही.

  सलग तीनवेळा निवडणुका लढवूनही त्यांना जिंकून येता आलं नाही. सुरुवातीला काँग्रेसमधून लढणारे शहाजीबापू नंतर राष्ट्रवादीमध्ये गेले. सलग 4 पराभवानंतर ते 2019 मध्ये शिवसेनेमधून त्यांनी निवडणूक लढवली. 2019 मध्ये 674 मतांनी त्यांना विजय मिळाला. हा विजय त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीतला सगळ्यात मोठा विजय आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Sanjay Raut (Politician), Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या