बेळगाव : मोठ्या वादानंतर संजय राऊत कार्यक्रमाला हजर राहणार, 'या' अटीवर मिळाली परवानगी

बेळगाव : मोठ्या वादानंतर संजय राऊत कार्यक्रमाला हजर राहणार, 'या' अटीवर मिळाली परवानगी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद पुन्हा उफाळून आला असताना संजय राऊत यांची बेळगावमध्ये एण्ट्री झाली.

  • Share this:

बेळगाव, 18 जानेवारी : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे बेळगावमधील नियोजित कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. संजय राऊत यांना कार्यक्रमाला हजर राहण्याची परवानगी देण्यात आली असली तरीही कर्नाटक पोलिसांनी त्यांना सीमाप्रश्नी वक्तव्य न करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच राऊत यांना कर्नाटक पोलिसांकडून सुरक्षाही देण्यात आली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद पुन्हा उफाळून आला असताना संजय राऊत यांची बेळगावमध्ये एण्ट्री झाली. पोलीस राऊत यांना कार्यक्रमाला हजर राहण्याची परवानगी देणार का, याबाबत अनिश्चितता होती. मात्र त्यांनी कर्नाटक पोलिसांसोबत चर्चा केली आणि तोडगा निघाला. बेळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर विमानतळ तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत खासदार राऊत यांची बंद खोलीत 10 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर खासदार राऊत हे आयोजकांसमवेत थेट मुक्कामाच्या ठिकाणी निघाले.

काल 'चूक' आज 'अभिमान', मेगाभरतीच्या वादावर चंद्रकांत पाटलांचा यू टर्न

हॉटेलमध्ये विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी काही निवडक नेत्यांशी खा.राऊत चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते गोखले रंगमंदिर येथील नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

'संजय राऊत हे रावणासारखे राक्षस'

संजय राऊत यांच्या बेळगाव दौऱ्याला कर्नाटक नवनिर्माण सेनेनं जोरदार विरोध केला आहे. 'संजय राऊत हे कोणत्याही परिस्थितीमध्ये बेळगाव मध्ये येऊ नयेत. कर्नाटक सरकार आणि बेळगाव प्रशासन कसं यांना परवानगी देते?' असा सवाल कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर यांनी केला होता. खासदार संजय राऊत हे रावणासारखे राक्षस असून बेळगावातील वातावरण बिघडवण्यासाठी ते बेळगावात येत आहेत, अशी विखारी टीकाही कर्नाटक नवनिर्माण सेनेने केली आहे. 'सूर्य चंद्र असेपर्यंत बेळगाव हे कर्नाटकाचा भाग असेल,' असं वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनी केलं आहे.

First published: January 18, 2020, 4:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading